एक राखी फौजी भाई के नाम..! - संकल्प विद्या मंदिर शाळेचा प्रेरक व कौतुकास्पद उपक्रम
विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी - मुख्याध्यापिका सौ.रेखाताई बडे
========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
भारत देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देवून व डोळ्यांत तेल घालून ऊन-वारा-पावसांत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करून देशसेवा करीत असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकल्प विद्या मंदिर यांच्या वतीने "एक राखी फौजी भाई के नाम" हा अनोखा, नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. भारतीय सैनिकांसाठी 225 'इको फ्रेंडली' राख्या व त्यासोबत एक शुभेच्छा संदेश पत्र तयार करून नुकतेच पाठविण्यात आले आहे.
अंबाजोगाई येथील संकल्प विद्या मंदिर येथे बुधवार, दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी हा अनोखा उपक्रम यशस्विरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थिनींनी स्वदेशी राखी स्वतःच्या हाताने तयार करून भारतीय सैनिकांबद्दल आपल्या सद्भावना शुभेच्छा संदेश पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. गुरूवार, दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी गुजरात युनिट येथे तैनात असलेल्या सैनिकांना 'स्पीड पोस्ट'च्या माध्यमातून राख्या पाठविण्यात आल्या आहेत. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.कैलास चोले व मुख्याध्यापिका सौ.रेखाताई बडे यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. या अनोख्या, प्रेरक आणि कौतुकास्पद उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी, विद्यार्थीनी, कर्मचारीवर्ग यांनी पुढाकार घेतला. अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी :
भारतीय सैनिकांना राखी व शुभेच्छा संदेश पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी यासाठी संस्था कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये बंधू भाव निर्माण झाला पाहिजे, सैनिकांकडून देश रक्षणाचे महान व पवित्र कार्य करण्यात येते. हा उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. हा अनोखा, नाविण्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
- सौ.रेखाताई बडे
(मुख्याध्यापिका, संकल्प विद्या मंदिर, अंबाजोगाई.)
◼️ विविध उपक्रमाचे व्हिडिओ पाहण्यासाठी
👇🏻👇🏻
https://youtube.com/@sankalpvidyamandirambajoga555
#SankalpVidyamandirAmbajogai
#SvmAmbajogai
#Ambajogai
#SBSSchoolAmbajogai
=======================
Comments
Post a Comment