अंबाजोगाईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली युवा स्वतंत्रता ज्योत रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग






युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीत आ.रोहितदादा पवार, युवा नेते रोहित पाटिल यांचा ही रॅलीत प्रेरक सहभाग

=========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे

(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)


समाजात राष्ट्रभक्ती, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा बळकट व्हावी. या उद्देशाने अंबाजोगाईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत युवकांसह विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग असतो. तो यावर्षी ही होता. "वंदे मातरम्, भारत माता की जय" या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आ.रोहितदादा पवार, युवा नेते रोहित आर.आर.पाटील (तासगांव) यांचा ही रॅलीत सहभाग होता.



मागील सोळा वर्षांपासून डॉ.नरेंद्रजी काळे यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई शहरात युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी या रॅलीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ झाला. ही रॅली कुत्तरविहीर, मंडीबाजार, गुरूवारपेठ, गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे निघून या रॅलीचा समारोप वेणूताई चव्हाण कन्या विद्यालयाच्या भव्य प्रांगणात राष्ट्रगिताने व संविधानाची सामूहिक शपथ घेऊन झाला. या रॅलीत आ.रोहितदादा पवार, रोहित पाटील, केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख, ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संतराम कराड, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस.बी.सय्यद, अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, मुजीब काझी, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.अरूंधती पाटिल, सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकूंद राजपंखे, कवी राजेंद्र रापतवार, डॉ.अनंत मरकाळे, जनसहयोगचे श्याम सरवदे, आंतरभारतीचे दत्ता वालेकर यांच्यासह विविध सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, पत्रकार, वकील, कलावंत, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, कवी, साहित्यिक व युवक - युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.



एकता व बंधुभाव जोपासा - आ.रोहितदादा पवार


युवकांनी राष्ट्रभक्ती, देशप्रेम व बंधुभाव जोपासावा. सार्वभौमत्व ही महत्वपूर्ण बाब आहे. सर्व प्रथम राष्ट्र, मग इतर बाबी. युवकांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. राष्ट्र मजबूत करण्यासाठी युवा संघटन महत्वपूर्ण ठरते. यासाठी युवकांनी योग्य दिशा ओळखून काम केले पाहिजे. समाजासाठी काही तरी करण्याची भावना मनात ठेवा. असे आवाहन आ.रोहितदादा पवार यांनी केले.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)