कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंबाजोगईत आज राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार वितरण व व्याख्यान युवा प्रतिष्ठान, अंबाजोगाईचा पुढाकार =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) शोषित, पिडीत व उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी शासन, प्रशासन व प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झिजविणारे कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात उपेक्षित माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळावी. यासाठी युवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांच्या वतीने समाजात प्रबोधन करणारे, धम्म चळवळ गतीमान करून योगदान देणारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे ९ वे वर्ष आहे. कर्मवीर ऍड.एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार-२०२५ चे वितरण व मान्यवरांचे व्याख्यान आज शनिवार, दि.२४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.विजय कुमठेकर (जालना) तर उद्घाटक म्हणून दिपक वजाळे (उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई.)...