Posts

पत्रकारांच्या पाल्यांना बन्सल क्लासेस मध्ये 50 टक्क्यांची सूट

Image
- व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमात क्लासेसचे महाराष्ट्र प्रवर्तक चंदूलालजी बियाणी यांच्या वतीने कोअर कमिटी सदस्य पारस बोरा यांची घोषणा ============================================= बीड / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांसाठी घर, त्यांचे आरोग्य, पाल्यांचे शिक्षण, सेवानिवृतीनंतरची उपजिविका, अन् बदलते तंत्रज्ञान यावर आधारित पंचसूत्री ठरविली आहे. त्यातील पंचसुत्रीनुसार पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी बन्सल क्लासेसकडून 50 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. क्लासेसचे महाराष्ट्र प्रवर्तक चंदूलालजी बियाणी यांच्या वतीने कोअर कमिटी सदस्य पारस बोरा यांनी बीड येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनात ही घोषणा केली. या घोषणेचे पत्रकार बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या जिवनात नवी आशा निर्माण करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 350 पत्रकारांचा 10 लाख रूपयांपर्यंत अपघात आणि आरोग्य विमा उतरविण्यात आला आहे. पत्रकारांच्या पाल्यांचे मोफत शिक्षण व्हावे यासाठी व...

अतुल कसबे यांच्यासारख्या युवकांना राजकारणात संधी उपलब्ध करून देण्याचे काम काकाजी करीत आहेत - युवा नेते अक्षय मुंदडा

Image
भारतीय जनता पक्षात प्रत्येकाचे स्वागत - ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा अतुल कसबे यांच्यासह अंबाजोगाई शहर व तालुक्यातील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश =============================================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून होत असलेला सर्वांगिण विकास यामुळे सर्वसामान्य माणूस आज भाजपाशी जोडला जात आहे. मुंदडा कुटुंबियांना मागील अनेक वर्षांपासून भक्कम साथ व ताकद देणारा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करीत आहोत असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केले. तर अतुल कसबे यांच्या सारख्या युवकांना राजकारणात संधी उपलब्ध करून देण्याचे काम काकाजी हे करीत आहेत, आगामी काळात सर्व...

व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांना अच्छे दिन येतील : खासदार इम्तियाज जलील

Image
बीडमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन ; शेकडो पत्रकारांची उपस्थिती --------------------------------------------------------------------------------- बीड / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) देशभरात व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य याकडे लक्ष दिले जातेय. व्हॉईस ऑफ मीडियाचे नेतृत्व करणारी फळी पाहता पत्रकारांचे देखील अच्छे दिन येतील, असा विश्वास निर्माण झाला आहे, असे मत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. बीड येथील वैष्णो पॅलेस येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन खासदार डॉ.प्रितम मुंडे, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हस्ते रविवारी (दि.३०) झाले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म...

खोलेश्‍वर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन

Image
आयुष्यात ध्येय समोर असणे गरजेचे - अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार ============================================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)  तुमची जडण - घडण उत्तम होण्यासाठी तसेच तुम्ही एक जबाबदार व सुजाण नागरिक व्हावे यासाठी खोलेश्‍वर महाविद्यालयाने तुमच्यावर जे चांगले संस्कार केले आहेत. त्या संस्कारांची शिदोरी सोबत ठेवून तुम्ही भविष्यात वाटचाल करावी, कोणतेही काम करा मात्र आयुष्यात एक चांगला माणूस बनायला शिका असे आवाहन अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार यांनी केले. त्या खोलेश्‍वर महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात शनिवार, दि. 29 एप्रिल रोजी खोलेश्‍वर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर हे होते. तर यावेळी व्यासपीठावर भाशिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, केंद्रिय कार्य...

ॲड.माधव (आप्पा) जाधव मित्रमंडळ संपर्क कार्यालय परळी (वै.) चा भव्य उद्घाटन सोहळा व स्नेहभोजन

Image
 ▫️ सस्नेह निमंत्रण ▫️ || सेवा विकास हाच ध्यास..!  || प्रति, श्रीमान / श्रीमती :......................................................... आपणांस कळविण्यात आनंद होत आहे, ॲड.माधव (आप्पा) जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालय परळी (वै.) चा  भव्य उद्घाटन सोहळा व स्नेहभोजन रविवार, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता  खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमास व भोजनास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. ▫️शुभहस्ते ▫️ मा.युवराज छत्रपती संभाजीराजे (स्वराज्य प्रमुख, माजी राज्यसभा सदस्य.) मा.शिवश्री सौरभदादा खेडेकर (महासचिव, संभाजी ब्रिगेड.) ▫️कार्यक्रमाचे अध्यक्ष▫️ मा.प्रभाकररावजी वाघमोडे (नाना) (मा.सभापती, समाजकल्याण, जि.प.बीड.) ▫️प्रमुख अतिथी ▫️ मा.श्री.माणिकरावजी कदम (प्रदेशाध्यक्ष, भारत राष्ट्र किसान समिती) मा.श्री.कालिदासजी आपेट (कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.) मा.श्री.अशोकरावजी हिंगे (मराठवाडा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.) मा.श्री.बाबुराव मुंडे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस) ▫️प्रमुख उपस्थिती ▫️ मा.श्री.महेंद्रजी निकाळजे (रिपाइं नेते, आठवले गट) मा....

शेती प्रश्नांची जाण असणारे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार..!

Image
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले ============================================== "विदर्भातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आमदार नानाभाऊ पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केलेली निवड पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण, जेव्हापासून आमदार नानाभाऊ हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात शेती प्रश्नांची जाण असणारे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यात कोणतीही शंका नाही." ================================================ महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहिल्यास काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद आ.नानाभाऊ पटोले यांच्याकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. हे आज प्रखरपणे जाणवू लागले आहे. कारण, आ.नानाभाऊ पटोले हे कुणबी (ओबीसी) समाजातून येतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते कायमच आक्रमक ही असतात. एवढेच नव्हे, तर आणखी ही कारणे आहेत. आ.नानाभाऊ पटोल...

शिष्यवृत्तीधारक निवड यादीत खोलेश्र्वरचे तब्बल ५ विद्यार्थी झळकले

Image
  श्री खोलेश्र्वर माध्यमिक विद्यालयाचे एन.एम.एम.एस परीक्षेत सुयश ============================================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील तब्बल पाच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये गुणानुक्रमे कु.प्रिया रमाकांत शिंदे (११७ गुण), कु.माया भारत सौंदडे (१०५ गुण), कु.स्नेहल ज्ञानदेव भताने (१०३ गुण), चि.शिवम केशव मुंडे (१०० गुण), कु.आदिती भीमा वाघमारे (६३ गुण) प्राप्त करून या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे या स्पर्धेचे प्रमुख शिक्षक धनंजय जब्दे यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, उपाध्यक्ष जीतेश चापसी, कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, शहरातील केंद्रीय कार...