अतुल कसबे यांच्यासारख्या युवकांना राजकारणात संधी उपलब्ध करून देण्याचे काम काकाजी करीत आहेत - युवा नेते अक्षय मुंदडा
भारतीय जनता पक्षात प्रत्येकाचे स्वागत - ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा
अतुल कसबे यांच्यासह अंबाजोगाई शहर व तालुक्यातील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
===============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून होत असलेला सर्वांगिण विकास यामुळे सर्वसामान्य माणूस आज भाजपाशी जोडला जात आहे. मुंदडा कुटुंबियांना मागील अनेक वर्षांपासून भक्कम साथ व ताकद देणारा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करीत आहोत असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केले. तर अतुल कसबे यांच्या सारख्या युवकांना राजकारणात संधी उपलब्ध करून देण्याचे काम काकाजी हे करीत आहेत, आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व निर्माण करण्याचे काम करण्यात येईल असे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी सांगितले. अंबाजोगाई शहरातील युवक कार्यकर्ते अतुल कसबे यांच्यासह त्यांच्या अंबाजोगाई शहर व तालुक्यातील असंख्य युवक, मित्र यांनी आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक 1 मे रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
माय सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करणारे सामाजिक कार्यकर्ते अतुल कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर व तालुक्यातील असंख्य युवक मित्र कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोमवारी आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्वांचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, शेळी मेंढी पालन महामंडळाचे माजी (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) अध्यक्ष बालासाहेब दोडतले, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे, माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर काचगुंडे, हिंदुलाल काकडे, माजी नगरसेवक संजय गंभीरे यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित जोगदंड, ऍड.संतोष लोमटे, वैजेनाथ देशमुख, बळीराम चोपने, अनंत अरसुडे, श्री डांगे, अमोल पवार, लामतूरे, मयुर रणखांब, कडबाने, कापसे आदींसह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष प्रवेश सोहळ्याचे सुत्रसंचालन भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून अतुल कसबे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले. कसबे यांच्यामुळे अंबाजोगाई तालुक्यासह शहरातील विविध प्रभागात भाजपाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले. विशेषतः प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाचे संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे पुजारी यांनी सांगितले. तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे यांनी सांगितले की, अतुल कसबे यांच्यामुळे युवकांचा एक मोठा समूह भाजपाशी जोडला गेला आहे. अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागात याचा मोठा फायदा होणार आहे असे जिल्हा उपाध्यक्ष लोमटे यांनी नमूद केले. आपल्या भाजपा प्रवेशाबाबत बोलताना अतुल कसबे म्हणाले की, दिवंगत लोकनेत्या डॉ.विमलताई मुंदडा यांचे प्रभावी नेतृत्व पाहत माझ्यासारख्या अनेक युवकांची जडण - घडण झाली आहे. आमदार सौ.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते काकाजी व युवा नेते अक्षयभैय्या यांनी अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व भरीव निधी उपलब्ध केला आहे. आज संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मुंदडा परिवार 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध आहे. मुंदडा कुटुंबिय प्रत्येकाच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी होतात, सर्वधर्मीय युवक कार्यकर्ते यांना भक्कम आधार व ताकद देतात, अल्पसंख्यांक तसेच वंचित बहुजन समाजाला पाठबळ व योग्य त्या ठिकाणी राजकीय संधी उपलब्ध करून देण्याचे काम फक्त ज्येष्ठ नेते काकाजी व युवा नेते अक्षयभैय्या हेच करीत आहेत. त्यामुळे माझा मित्र परिवार, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य लोकांसाठी आपण आज काकाजी व भैय्या यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्ष महादू मस्के, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे, माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी, संजय गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाला अंबाजोगाई तालुका, शहरात अधिक मजबूत करणार आहोत. विशेषतः प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाची ताकद आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगून अंबाजोगाई शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपा हा पक्ष उत्तम कार्य करीत आहे, भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे, केंद्रात ३०० पेक्षा जास्त खासदार घेऊन राष्ट्रीय हिताला महत्त्व देत पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तास्थानी आहे. अशा ताकदवान पक्षात युवकांचा इन्कमींगचा अखंड झरा आपण सुरूच ठेवणार आहोत. असे अतुल कसबे म्हणाले. तर अंबाजोगाई शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी युवकांचे अभिनंदन केले. युवकांच्या मदतीसाठी व विकासासाठी सदैव भाजपाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. काकाजी व अक्षयभैय्या यांनी युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे केज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===============================================
Comments
Post a Comment