पत्रकारांच्या पाल्यांना बन्सल क्लासेस मध्ये 50 टक्क्यांची सूट


- व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमात क्लासेसचे महाराष्ट्र प्रवर्तक चंदूलालजी बियाणी यांच्या वतीने कोअर कमिटी सदस्य पारस बोरा यांची घोषणा

=============================================

बीड / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांसाठी घर, त्यांचे आरोग्य, पाल्यांचे शिक्षण, सेवानिवृतीनंतरची उपजिविका, अन् बदलते तंत्रज्ञान यावर आधारित पंचसूत्री ठरविली आहे. त्यातील पंचसुत्रीनुसार पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी बन्सल क्लासेसकडून 50 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. क्लासेसचे महाराष्ट्र प्रवर्तक चंदूलालजी बियाणी यांच्या वतीने कोअर कमिटी सदस्य पारस बोरा यांनी बीड येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनात ही घोषणा केली. या घोषणेचे पत्रकार बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या जिवनात नवी आशा निर्माण करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 350 पत्रकारांचा 10 लाख रूपयांपर्यंत अपघात आणि आरोग्य विमा उतरविण्यात आला आहे. पत्रकारांच्या पाल्यांचे मोफत शिक्षण व्हावे यासाठी विविध क्लासेस, शैक्षणिक संस्थांची बोलणे सुरू असून त्यातून सर्व पाल्यांना मोफत शिक्षण कसे मिळेल या दृष्टीने व्हॉईस ऑफ मीडिया प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाचे फळ म्हणून कोटा येथील प्रसिध्द बन्सल क्लासेसच्या मराठवाड्यातील इतर सर्व शाखांमध्ये 50 टक्के फिस मध्ये सूट जाहीर केली आहे. त्यामुळे दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेणार्‍या पाल्यांच्या पालकांचे किमान 50 हजार ते 1 लाख रूपयांची बचत होणार आहे.

जिल्हाध्यक्षांची शिफारस लागणार :

================================

बन्सल क्लासेस मध्ये शिक्षण घेण्यासाठी पालकांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची शिफारस लागणार आहे. बीडच्या विद्यार्थ्याला जर लातूर येथे अ‍ॅडमीशन घ्यायचे असेल तर त्याला बीडच्या जिल्हाध्यक्षांचे शिफारस पत्र लागणार आहे.


---------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड