Posts

शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्या - किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Image
मराठवाड्यात अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान  ======================================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) गेल्या दोन-तीन दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यात व महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतातील हाता तोंडाशी आलेला घास रब्बी पिक व तसेच फळे, भाजीपाला व बागायती शेती या सर्वांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी अस्मानी संकटाला बळी पडत आहे. अगोदरच मराठवाड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामध्ये या अस्मानी संकटाने शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाईची रक्कम म्हणून ताबडतोब देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे ई - मेल द्वारे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य महाराष्ट्र राज्य ॲड.माधव जाधव यांनी केली आहे. ================

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत कर्मचाऱ्यांनी काढली मोटासायकल रॅली

Image
  रॅलीत महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; आंदोलक कर्मचारी संपावर ठाम ================================================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) भावासाठी…बहिणीसाठी…पत्नीसाठी…कुटुंबासाठी…‘ एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत आज दिनांक १८ मार्च रोजी कर्मचाऱ्यांनी मोटार सायकल रॅली काढून वेधले शासनाचे लक्ष. या रॅलीमधे महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. संपाच्या पाचव्या दिवशी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासह शासनाने जुन्या पेन्शनची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा प्रकारच्या घोषणा ही दिल्या. अंबाजोगाई शहरातील हजारोंच्या संख्येने परिचारिका, वर्ग तीन, वर्ग चार, शासकीय - निमशासकीय - शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. राज्यातील दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची 'जुनी पेन्शन' योजना पूर्ववत लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटना दिनांक 14 मार्चपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. पण, कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून चर्चेसा...

अखेर सासू व सुनेत घडून आला सुसंवाद..!

Image
अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाचा कौतुकास्पद पुढाकार  ================================================ अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  तालुक्यातील चनई येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला सदस्या यांचे त्यांच्या सूनेशी मागील तीन वर्षांपासून साधे बोलणे ही नाही, तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. जेव्हा ही बाब ज्येष्ठ नागरिक संघाच्या कौटुंबिक हिंसाचार निपटारा समितीला समजली तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन सासू - सुनेत मनोमिलन व सुसंवाद घडवून आणला. गुरूवार, दिनांक 16 मार्च रोजी झालेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कौटुंबिक हिंसाचार निपटारा समितीचे पदसिद्ध सचिव लक्ष्मण गोरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, कार्याध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर, डॉ.दामोदर थोरात, सचिव मनोहरराव कदम, कोषाध्यक्ष धनराज मोरे, सहसचिव पद्माकर सेलमोकर, कमलताई बरूळे, इंदू पोटपल्लेवार, मंगलताई भुसा, दत्तात्रय आंबाड, भास्कर हरेगावकर, श्रीधर काळेगावकर, आशाताई वाघमारे, विजय विर्धे, ललिताताई पुजारी, सोळंके मॅडम, गावरस्कर, वनमाला वाघ, चंद्ररेखा मुळे, विश्वनाथ गि...

शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी - आमदार भाई जगताप

Image
बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यालयास आमदार भाई जगताप यांची सदिच्छा भेट ================================================ अंबाजोगाई ( संपादक रणजित डांगे - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क ) केवळ टोलवा - टोलवी न करता न दिलासा देणे आवश्यक आहे. देशात जिथे - जिथे काॅंग्रेस पक्षाचे सरकार आहे तिथे - तिथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद म्हणून जुनी पेन्शन योजना शिंदे - फडणवीस सरकारने लागू करावी अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली. ते अंबाजोगाईत बोलत होते. बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या "काॅंग्रेस भवन" या कार्यालयास आमदार भाई जगताप यांनी शनिवार, दिनांक 18 मार्च रोजी सदिच्छा भेट दिली. एका कार्यक्रमानिमित्त अंबाजोगाई तालुक्यात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या "काॅंग्रेस भवन" या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळेस जिल्हाध...

प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे "राज्यस्तरीय नाट्यगौरव पुरस्कारा"ने सन्मानित

Image
सर्वस्तरांतून प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव =========================================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी येथील नाट्यशास्त्र विभागातील प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांना अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले. येथील जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात  दि.११ व १२ मार्च २०२३ रोजी संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष ऍड.अण्णाराव पाटील, उद्घाटक ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, प्रमुख अतिथी मा.पंडितराव दौंड, काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते वसंतराव मोरे, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब, विद्याधर पांडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. एक कवी - लेखक - अभिनेता - दिग्दर्शक - समीक्षक आणि स...

मी तर काहीही चुकीचं केलं नाही...ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर हसन मुश्रीफांची

Image
================================================== मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांना सलग दुसऱ्या दिवशी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. ३५ कोटी रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांची आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. विशेष म्हणजे अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिलं आहे.‌ गेल्या आठवड्यात ईडीने हसन मुश्रीफ यांना नोटीस बजावली होती. सोमवारी चौकशीसाठी हजर राहा, अशी नोटीस ईडीने पाठवली होती. परंतु, हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुश्रीफ ईडी कार्यालयात पोहोचले, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीने त्यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. मुश्रीफ यांनी चौकशीला सामोरे जात सहकार्य केलं. ईडीने पुन्हा सोमवारी साडेबारा वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे. आठ तासाच्या चौकशीनंतर ही तुमच्या चेहऱ्यावर थकवा का नाही ? तुम्ही आनंदी दिस...

जिल्हा परिषद शाळेचे वैभव वाढले ; कुंबेफळचा वैभव पिसाळ जाणार इस्रो सहलीला

Image
जिल्हास्तरीय परीक्षेत मिळवले घवघवीत यश ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) इस्रो व नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय अंतिम चाचणी परीक्षेचा निकाल अखेर सीईओ अजित पवार यांच्या स्वाक्षरी नंतर सोमवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळकरी मुला - मुलींना प्रथमच इस्त्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीची संधी मिळत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ, केंद्र अंबासाखर कारखाना ता.अंबाजोगाईचा विद्यार्थी वैभव चंद्रसेन पिसाळ याची निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र इस्रो श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश थुंबा स्पेस म्युझियम तिरूवअनंतपुरम, केरळ विश्वेश्वरैय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजी म्युझियम बेंगलोर, कर्नाटक व नासा या ठिकाणी जाता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा वि...