शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्या - किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
मराठवाड्यात अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान
========================================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
गेल्या दोन-तीन दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यात व महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतातील हाता तोंडाशी आलेला घास रब्बी पिक व तसेच फळे, भाजीपाला व बागायती शेती या सर्वांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी अस्मानी संकटाला बळी पडत आहे. अगोदरच मराठवाड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामध्ये या अस्मानी संकटाने शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाईची रक्कम म्हणून ताबडतोब देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे ई - मेल द्वारे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य महाराष्ट्र राज्य ॲड.माधव जाधव यांनी केली आहे.
================
Comments
Post a Comment