Posts

Showing posts from December, 2024

विनोद पोखरकर हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे आदर्श व्यक्तीमत्व

Image
विनोद पोखरकर हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे आदर्श व्यक्तीमत्व =================================== " विनोद पोखरकर हे बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यकर्ते म्हणून मागील काही वर्षांपासून अंबाजोगाई शहरात कार्यरत आहेत. त्यांचा स्वभाव रोखठोक आणि तेवढाच संवेदनशील आहे. पोखरकर हे बीड जिल्ह्यात सर्वदूर सुपरिचित आहेत. आज 28 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा लेख आपल्या माहितीस्तव देत आहोत..." =================================== विनोद सिद्रामआप्पा पोखरकर हे महाविद्यालयीन काळापासूनच कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. कायम मित्रांच्या गराड्यात राहणारे व गरजूंच्या मदतीला धावून जाणारे ते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी कायमच सामाजिक दायित्व जपले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून कार्य करून ते सामाजिक ऋण व्यक्त करीत आहेत. वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपताना समाजासमोर एक वेगळा आदर्श पोखरकर यांनी ठेवला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या मित्र परिवारात, पत्रकार मित्रांमध्ये, अधिकारी वर्गामध्ये त्यांच्या सहकारी मित्रामध्ये विनोद यांचे नांव प...

"रेशीमगाठी विवाह संस्थेने" मागील 8 वर्षांत मेळाव्यांच्या माध्यमातून जुळविले शेकडो विवाह

Image
मध्यस्थ अनोळखी व्यक्तींकडून विवाह जुळविताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी - भरतकाका पतंगे यांचे आवाहन  ==================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) धकाधकीच्या आयुष्यात एकिकडे कुटुंबात परस्परातील संवाद, जिव्हाळा कमी झाला आहे. तर दुसरीकडे मात्र आजच्या काळात रेशीमगाठी सकल मराठा विवाह संस्था ही समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज संस्थेचे अध्यक्ष तथा रेशीमगाठी सकल मराठा विवाह केंद्राचे संचालक भरतकाका पतंगे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही रेशीमगाठी सकल मराठा विवाह केंद्राच्या माध्यमातून मागील 7 ते 8 वर्षांत वधू-वर पालक परिचय मेळावे घेतले. या मेळाव्यांच्या माध्यमातून शेकडो नविन नाती जोडून लग्न जुळविण्याचे काम केले. हे सर्व या विवाह संस्थेच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासामुळे शक्य झाले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैली मध्ये सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे उदाहरणार्थ : टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सऍप यामुळे कुटुंबात परस्परातील संवाद, जिव्हाळा कमी झाला....

आ.नमिताताई मुंदडा यांनी दिलेला शब्द पाळला ; भोई समाजाला उपलब्ध करून दिली स्मशानभूमीसाठी जागा

Image
आ.नमिताताई मुंदडा यांनी दिलेला शब्द पाळला ; भोई समाजाला उपलब्ध करून दिली स्मशानभूमीसाठी जागा =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) दिलेला शब्द पाळत मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला अंबाजोगाईतील भोई समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. याबाबत अधिकृत माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रविण लक्ष्मण भोकरे यांनी दिली आहे. याबद्दल भोई समाजाकडून आ.मुंदडा यांचे जाहीरपणे आभार मानण्यात येत आहेत.  याबाबत अंबाजोगाई येथील भोईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण लक्ष्मण भोकरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून भोई समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत भोई समाजातील बांधवांना समाजाच्या ताब्यातील उघड्या व अपुऱ्या जागेवर पिढ्यान् पिढ्या अंत्यविधी करावा लागत होता, या बाबत मी प्रविण भोकरे व भोई समाज बांधवांसह आम्ही सर्वजणांनी मिळून केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, युवा नेते ...

सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या आणि रिन्यूएबल पॉवर क्षेत्रातील अराजकता - संजीव भोर पाटील

Image
================================== "सामाजिक कार्यकर्ते संजीव भोर पाटील यांनी ज्वलंत विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. लोकनायक मिडिया न्युज नेटवर्कच्या वाचकांच्या माहितीस्तव देत आहोत..." ================================== सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या आणि रिन्यूएबल पॉवर क्षेत्रातील अराजकता काही दिवसांपूर्वी मस्साजोग (ता.केज, जि.बीड) येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. ही घटना अतिशय संतापजनक व निषेधार्ह आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असणारे गुन्हेगार व त्यांच्या मागील खरे सूत्रधार पकडले गेले पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणांमध्ये वरवर जरी काही गोष्टी समोर आल्या असतील तरी या घटनेच्या मुळाशी गेल्यास पवन ऊर्जा, सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नवीन प्रकल्पांशी संबंधित अनेक गंभीर बाबी उजेडात येतील. संतोष देशमुख यांच्या अतिशय भयावह हत्येमागची पूर्ण पार्श्वभूमी समजून घेता ही एक महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी घटना तर आहेच शिवाय रिन्यूएबल पॉवर क्षेत्रात भविष्यातील गुंतवणुकीसाठी भीतीदायक अस...

अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला - राजेंद्र रापतवार

Image
ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार यांचे मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवर माता योगेश्वरी देवी उत्सवाच्या निमित्ताने उत्सव महिमा गीत लोकनायक मिडिया न्युज नेटवर्कच्या महाराष्ट्रातील लाखो वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते आपणांस निश्चितच आवडेल असा विश्वास आहे. (संपादक) =================================== अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला, देवीभक्त जनसागर उसळलेला.  चला आराध्यांनो गोंधळाला,   मार्गशीर्ष नवरात्र उत्सवाला. हे देवीमंदिर जयवंती काठाला, हेमाडपंथी, पाचमजली शिखर त्याला. ओंकाराकृती योगेश्वरीचा तांदळा, कमरेपर्यन्त शेंदुर आच्छादलेला.  योगशक्ती! या कुमरीका देवीला  यज्ञ, धर्म रक्षण ! दंतासुर वध केला.  हातात परडी जोगवा घेण्याला, गळ्यात कवड्यांची पोतमाला. संबळ-टाळांचा नाद झाला, गोंधळ-गीत ऊर्जा भक्तीला. आता मुखाने उदो-उदो बोला,  हळदी-कुंकु, खण-नारळ ओटीला. इरकली-पैठणी परिधानाला, वेणी-मोगरा सुगंध दरवळला.  नंदादिप तेवता, तेजाळलेला,  गाभारा प्रकाशाने उजळला. नैवद्य पुरणपोळीचा आला, नागिलपान तांबुल प्रसादाला. धरण, ठाण मांडल...

अखेर आ.नमिता मुंदडा यांच्यामुळे कैकाडी समाजाला मिळाली स्मशानभूमीसाठी १५ गुंठे जागा

Image
अखेर आ.नमिता मुंदडा यांच्यामुळे कैकाडी समाजाला मिळाली स्मशानभूमीसाठी १५ गुंठे जागा आ.नमिताताई मुंदडा यांचे कैकाडी समाजाने मानले आभार ==================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला अंबाजोगाईतील कैकाडी समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्यामुळे मार्गी लागला आहे. याबाबत अधिकृत माहिती अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश कोंडीराम जाधव यांनी दिली आहे. याबद्दल कैकाडी समाजाकडून आ.मुंदडा यांचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत.  याबाबत अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश कोंडीराम जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून कैकाडी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत कैकाडी समाजातील बांधवांना समाजाच्या ताब्यातील उघड्या व अपुऱ्या जागेवर पिढ्यान् पिढ्या अंत्यविधी करावा लागत होता, या बाबत अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश कोंडीराम जाधव यांनी कैकाडी समाजात...

"सेल्फी" नाटक हे आपल्या स्वत:च्या जीवनातील प्रश्नांकित दुनियेला लपवत दुसऱ्याच्या जीवनात डोकावणाऱ्या माणसांच्या मनोवृत्तीवर टाकलेला प्रकाशझोत आहे - ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार

Image
"सेल्फी" नाटक हे आपल्या स्वत:च्या जीवनातील प्रश्नांकित दुनियेला लपवत दुसऱ्याच्या जीवनात डोकावणाऱ्या माणसांच्या मनोवृत्तीवर टाकलेला प्रकाशझोत आहे - ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार =================================== "सेल्फी" लेखिका - शिल्पा नवलकर, दिग्दर्शक - स्नेहल पुराणिक गोपाला फाऊंडेशन परभणी, प्रस्तुत निर्माती तेजस्विनी दामुके प्रस्तुत हौशी नाट्य स्पर्धेच्या नाटकाचे सहभागी कलाकार - मिनाक्षी - क्रांती दैठणकर, स्वाती - कल्पना कुलकर्णी, विभावरी - सुषमा कुलकर्णी, तनुजा - पुनम श्रीरामवार, आत्मती - सिमंतीनी कुंडीकर. या अभिनयांनी समृद्ध संपूर्ण स्रीपात्राचं कुसुम नाट्यगृह, नांदेड या नाट्यगृहात अवघ्या केवळ 15/- रूपयांच्या मोबदल्यात मी दि.2 डिसेंबर 2024 सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता पाहिलेल दोन अंकी हौशी नाट्य स्पर्धेसाठीच होय फक्त महिलांच्या संचाचच हे सेल्फी नाटक 63 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2024 - 25 साठी सहभागी झालेलं हे नाट्य. सेल्फी नाट्य कृतीवर रसिक, श्रोत्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपातील ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार यांचे मनोगत आपल्या ल...