"रेशीमगाठी विवाह संस्थेने" मागील 8 वर्षांत मेळाव्यांच्या माध्यमातून जुळविले शेकडो विवाह
मध्यस्थ अनोळखी व्यक्तींकडून विवाह जुळविताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी - भरतकाका पतंगे यांचे आवाहन
====================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
धकाधकीच्या आयुष्यात एकिकडे कुटुंबात परस्परातील संवाद, जिव्हाळा कमी झाला आहे. तर दुसरीकडे मात्र आजच्या काळात रेशीमगाठी सकल मराठा विवाह संस्था ही समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज संस्थेचे अध्यक्ष तथा रेशीमगाठी सकल मराठा विवाह केंद्राचे संचालक भरतकाका पतंगे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही रेशीमगाठी सकल मराठा विवाह केंद्राच्या माध्यमातून मागील 7 ते 8 वर्षांत वधू-वर पालक परिचय मेळावे घेतले. या मेळाव्यांच्या माध्यमातून शेकडो नविन नाती जोडून लग्न जुळविण्याचे काम केले. हे सर्व या विवाह संस्थेच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासामुळे शक्य झाले आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैली मध्ये सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे उदाहरणार्थ : टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सऍप यामुळे कुटुंबात परस्परातील संवाद, जिव्हाळा कमी झाला. आज नात्यांमध्येच दुरावा निर्माण झाला आहे. फक्त आणि फक्त व्यवहारापुरता संबंध राहिला आहे. त्यामुळेच नात्यातील आदर, समर्पण, प्रेम, गोडवा, जिव्हाळा, संवाद हा कमी झालेला दिसून येत आहे. आज - काल कुणीच कुणाला वेळ देत नसल्यामुळे पाहुणे मंडळी कडून सुद्धा लग्न जुळविणे, एकमेकांच्या शुभ कार्यात मदतीला न जाणे हे प्रकार वाढले आहेत आणि म्हणूनच लग्न जुळविण्याकरता मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच लग्न जुळविण्याच्या पसंती करीता दोन्ही बाजूंनी अटी, शर्थी, अपेक्षा वाढल्या आहेत. उदाहरणार्थ : मुलाला गडगंज इस्टेट हवी, मुलाला पुण्यात मोठे पॅकेज हवे, मुलाला स्वतःचा फ्लॅट, बंगला, चारचाकी गाडी, जमीन, शासकीय नोकरी हवी. छोटे कुटुंब हवे, सासू-सासरे गावीच हवेत. नणंद, जावू असू नयेत. अशा वधु पक्षाच्या अवाजवी अपेक्षांमुळे लग्न जमविणे सध्या खूप कठीण व जिकरीचे होत चालले आहे. त्यामुळे एकिकडे वधू-वरांचे वय वाढत आहे. तर दुसरीकडे मात्र अपेक्षा ही पूर्ण होत नसल्यामुळे वेळेत लग्न न होण्याचे प्रमाण वाढले आहे. मग अशा नामी संधीचा फायदा घेऊन काही दलाल लोक आम्ही तुमच्या मुलाचे, मुलीचे लग्न जमवून देतो असे खोटेच आश्वासन देऊन मुलांकडील मंडळींना एक सुंदर मुलीचा तर मुलींकडील मंडळींना रूबाबदार मुलाचा फोटो दाखवितात. तुमच्या स्थळाला पसंती आली आहे. असे खोटेच सांगतात. त्याकरीता आम्हाला गाडी भाडे, जाण्या येण्याच्या खर्चाचे पैसे मोठ्या प्रमाणात मागतात. मग संबंधितांनी त्यांना फोन पे वर पैसे दिल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर कायमचा बंद होतो. अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यासाठी वधू-वर संस्था खरी आहे की, बनावट. ती संस्था रजिस्टर आहे काय..? याची माहिती आपण घेतली पाहिजे. शाहनिशा करूनच वधू-वरांच्या नांवाची नोंदणी करून, व रितसर पैसे भरलेली पावती घ्यावी. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यावी. आम्ही रितसर नोंदणी करून, फॉर्म भरून, बायोडाटा, फोटो, तपशीलवार माहिती घेऊन, ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेशीमगाठी विवाह संस्थेच्या व्हॉट्सॲप ग्रुप वरून शेयर करतो. यामुळे योग्य वधुला सुयोग्य वर निवडणे सोयीचे होते. चांगल्या कुटुंबात सोयरीक घडवून आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे विवाह संस्थेच्या माध्यमातून आपल्या मुला - मुलींचे लग्न जुळविताना आपली फसवणूक टाळण्यासाठी वरील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा. रेशीमगाठी सकल मराठा विवाह संस्था आपल्या सेवेसाठी 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास उपलब्ध आहे. ही संस्था तुमची आपली आहे. आपण एकदा आवश्य भेट द्यावी. आमच्याकडे शेकडो उपवर, उच्च विद्याविभूषित, खाजगी कंपन्या आणि शासकीय सेवेतील विविध विभागांतील नौकरदार, उद्योजक, व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी मुला - मुलींचे बायोडाटा पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याचा लाभ विवाह योग्य मुला - मुलींच्या पालकांनी घ्यावा. असे आवाहन संचालक भरतकाका पतंगे, रेशीमगाठी सकल मराठा विवाह संस्था, बस स्टॅण्डच्या पाठीमागे, गोवर्धन बिल्डिंग, प्रशांतनगर, अंबाजोगाई (जिल्हा बीड), संपर्क क्रमांक - +91 9545784111) यांच्या वतीने करण्यात येत आहे.
====================================
Comments
Post a Comment