आ.नमिताताई मुंदडा यांनी दिलेला शब्द पाळला ; भोई समाजाला उपलब्ध करून दिली स्मशानभूमीसाठी जागा

आ.नमिताताई मुंदडा यांनी दिलेला शब्द पाळला ; भोई समाजाला उपलब्ध करून दिली स्मशानभूमीसाठी जागा

===================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

दिलेला शब्द पाळत मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला अंबाजोगाईतील भोई समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. याबाबत अधिकृत माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रविण लक्ष्मण भोकरे यांनी दिली आहे. याबद्दल भोई समाजाकडून आ.मुंदडा यांचे जाहीरपणे आभार मानण्यात येत आहेत. 

याबाबत अंबाजोगाई येथील भोईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण लक्ष्मण भोकरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून भोई समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत भोई समाजातील बांधवांना समाजाच्या ताब्यातील उघड्या व अपुऱ्या जागेवर पिढ्यान् पिढ्या अंत्यविधी करावा लागत होता, या बाबत मी प्रविण भोकरे व भोई समाज बांधवांसह आम्ही सर्वजणांनी मिळून केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांना प्रत्यक्ष भेटून याप्रश्नी त्यांनी स्वतः लक्ष देण्याची विनंती केली असता, या सर्व मान्यवरांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशी माहिती भोकरे यांनी दिली. याविषयी भोई समाजाचे युवक कार्यकर्ते प्रविण भोकरे व समाज बांधवांनी १५ गुंठे जागा उपलब्ध व्हावी यासाठी काकाजींच्या मार्गदर्शनानुसार एकिकडे मा.तहसिलदार साहेब यांना १५ मे २०२४ रोजी भोईराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून अर्ज देवून सदरचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मुख्याधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे सातत्यपूर्ण प्रयत्न, पाठपुरावा व विनंती केली. तर दुसरीकडे मात्र आ.मुंदडा यांनी ही शासन दरबारी वेळोवेळी हा प्रश्न मांडला आणि सदर प्रस्तावाबाबत सकारात्मक पाठपुरावा करून रेणुकामाता मंदिर रोड जवळील अंबाजोगाई येथील भोई समाजाच्या "स्मशानभूमी" साठी सर्व्हे नंबर - ६२१/३ मधील १५ गुंठे जागा शासकीय गायरानातून उपलब्ध करून दिली. याबाबत बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे अखेर आ.नमिताताई मुंदडा यांनी भोई समाजाला दिलेला शब्द खरा व पुर्ण केला. त्यामुळे अत्यंत आवश्यक असलेल्या भोई समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लावल्याबद्दल भोई समाजाकडून तसेच भोईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण भोकरे, उपाध्यक्ष नेताजी हिरवे, सचिव दत्ता हिरवे यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांचे तसेच शासन, प्रशासन, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.

==============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)