विनोद पोखरकर हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे आदर्श व्यक्तीमत्व



विनोद पोखरकर हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे आदर्श व्यक्तीमत्व

===================================

" विनोद पोखरकर हे बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यकर्ते म्हणून मागील काही वर्षांपासून अंबाजोगाई शहरात कार्यरत आहेत. त्यांचा स्वभाव रोखठोक आणि तेवढाच संवेदनशील आहे. पोखरकर हे बीड जिल्ह्यात सर्वदूर सुपरिचित आहेत. आज 28 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा लेख आपल्या माहितीस्तव देत आहोत..."

===================================

विनोद सिद्रामआप्पा पोखरकर हे महाविद्यालयीन काळापासूनच कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. कायम मित्रांच्या गराड्यात राहणारे व गरजूंच्या मदतीला धावून जाणारे ते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी कायमच सामाजिक दायित्व जपले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून कार्य करून ते सामाजिक ऋण व्यक्त करीत आहेत. वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपताना समाजासमोर एक वेगळा आदर्श पोखरकर यांनी ठेवला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या मित्र परिवारात, पत्रकार मित्रांमध्ये, अधिकारी वर्गामध्ये त्यांच्या सहकारी मित्रामध्ये विनोद यांचे नांव प्रेमाने काढले जाते. विनोद यांचेसारखी मेहनती, उद्यमी, गुणवंत माणसे समाजामध्ये असली पाहिजेत आणि अशा गुणीजणांच्या पाठीशी ज्येष्ठांसह मित्र परिवार वेळोवेळी खंबीरपणे उभे राहीला आहे. समाजसेवेचा वसा जोपासणा-या या तरूणांना नवा संदेश देण्याचे काम पोखरकर हे करीत आहेत. विनोद यांना मी मागील 24 वर्षांपासून ओळखतो. जेव्हा ते खोलेश्वर महाविद्यालयात शिकत होते तेव्हापासून, पुढे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकत असताना, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हॉटेल सुरभीच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायात जम बसविला. अंबाजोगाई व इतर शहरात ही हॉटेल सुरभीच्या अनेक शाखा सुरू केल्या. अनेक गरजू युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज पोखरकर हे बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेले आहेत. असे असले तरी ते कधीच पैशाच्या मागे धावले नाहीत.‌ तर त्यांनी कमावली ती माणसं. संपत्ती जमविण्याची अपेक्षा तेव्हाही नव्हती. आणि आजही नाही. पण, आपण प्रत्येक काम सचोटीने, झोकून देऊन, चांगले केले पाहिजे, सामाजिक काम करताना खारीचा वाटा उचलला पाहिजे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. गरजूंना सहाय्य करणे, रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणे, आश्रम अशांना आर्थिक मदत वा मोफत कपडे, भांडी, पुस्तके, वह्या इत्यादींचं वाटप करून समाजकार्यात हातभार लावता येतो यावर पोखरकर यांचा विश्वास आहे. ते विविध उपक्रमात सहभाग घेतात. आपण आपला खारीचा वाटा उचलून अंशतः समाजाचं ऋण फेडू शकतो. यासाठी विनोद पोखरकर हे कार्य करीत आहेत. नाही तर हल्ली अनेक जण हे सगळ्या जगाशी तुसडेपणाने वागतात, शेजारी रडतोय तर रडू दे, रस्त्यावरून वृध्द आजोबा क्राॅसींग ओलाडंताना चाचपडत आहेत. तर राहू द्या त्याला तसेच, गावाला आग लागली तर लागू दे. अशा वेळी माझं काही कर्तव्य आहे, हेच जो विसरतो, त्याला आपण माणूस मानतो का..? नाही ना. याचे समाजभान ठेवून पोखरकर हे कार्य करीत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणून विनोद यांची सर्वदूर ओळख आहे. काही माणसं कर्तृत्ववाने आणि मनानेही श्रेष्ठ असतात. अशी माणसं आपला मोठेपणा दिसण्यातून नव्हे तर वागण्यातून, कृतीतून आणि कार्यातून दाखवून देत असतात. त्यांना एखाद्या गोष्टीचं भांडवल किंवा दिखाऊपणा करून लोकांची सहानुभूती मिळवता येत नाही असे व्यक्तिमत्व म्हणजे विनोद पोखरकर हे आहेत. त्यांच्या समाजोपयोगी, उल्लेखनीय, निःस्वार्थी कार्याची दखल एक दिवस समाज नक्कीच घेणार यात शंका नाही, विनोद यांचे वडील सिद्राम आप्पा यांनी ही पायाखाली जमीन कोणतीही असो, डोक्यावर आकाश कोणतेही असो प्रतिकुल, संघर्षमय परिस्थितीवर मात करून मोठ्या आत्मविश्वासाने सर्वसमावेशक, व्यापक दृष्टिकोन ठेवून वेळोवेळी गरजूंना मदत केली. वडील सिद्राम आप्पा यांचा वारसा बंधू प्रमोद यांच्या मदतीने व कुटुंबाच्या आशिर्वादाच्या पाठबळावर विनोद हे समर्थपणे पुढे चालवित आहेत. त्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष दिसून येते. आज बीड जिल्ह्यातील धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्य, शासकीय, वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक, नाट्य, पत्रकारीता, उद्योग या क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी विनोद यांचे निकटचे, मैत्रीचे, जिव्हाळ्याचे दृढ संबंध आहेत. तेवढेच सर्वसामान्य माणसाशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आपल्या ओळखीचा फायदा त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांसाठी केला आहे. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना काही पुरस्कार ही मिळाले आहेत. उद्योग व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी अन्याय, अत्याचार, विषमतेच्या विरोधात अनेक यशस्वी लढे देऊन अनेकांना दिलासा, न्याय मिळवून दिला. यांच्या स्वभावातील गोडी, सौजन्यशीलपणा, संकटसमयी धावून जाण्याच्या आंतरिक वृत्ती यामुळे त्यांची नेहमीचं सर्वांशी संवाद, समन्वय आणि समंजसपणाची भूमिका राहिलेली आहे. आज त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसायच नव्हे तर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांची महत्वाची भूमिका आणि योगदामुळे त्यांनी विविध क्षेत्रातील तसेच समाजातील अनेक मंडळींना त्यांना जोडता आले हे उल्लेखनीय आहे. अशा सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जोपासणाऱ्या प्रेरणादायी, ध्येयवादी, आदर्श व्यक्तिमत्वाचे, उपेक्षितांच्या आधारस्तंभाचे भावी जीवन सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदीमय, यशस्वी, उज्ज्वल, कार्यान्वित, दिशादर्शित, सुरक्षित, इच्छित मनोकामनापुर्तीचे आणि निरोगी आरोग्यमय जावो तसेच ते कार्यरत असलेली सर्व क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाने पावन होवोत याच वाढदिवसानिमित्त मित्रवर्य विनोदभैय्या पोखरकर यांना मंगलमय सदिच्छा व शुभेच्छा..!



*शब्दांकन - राधिका पब्लिसिटी, अंबाजोगाई.

मोबाईल - +919403927527


=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)