"सेल्फी" नाटक हे आपल्या स्वत:च्या जीवनातील प्रश्नांकित दुनियेला लपवत दुसऱ्याच्या जीवनात डोकावणाऱ्या माणसांच्या मनोवृत्तीवर टाकलेला प्रकाशझोत आहे - ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार
"सेल्फी" नाटक हे आपल्या स्वत:च्या जीवनातील प्रश्नांकित दुनियेला लपवत दुसऱ्याच्या जीवनात डोकावणाऱ्या माणसांच्या मनोवृत्तीवर टाकलेला प्रकाशझोत आहे - ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार
===================================
"सेल्फी" लेखिका - शिल्पा नवलकर, दिग्दर्शक - स्नेहल पुराणिक गोपाला फाऊंडेशन परभणी, प्रस्तुत निर्माती तेजस्विनी दामुके प्रस्तुत हौशी नाट्य स्पर्धेच्या नाटकाचे सहभागी कलाकार - मिनाक्षी - क्रांती दैठणकर, स्वाती - कल्पना कुलकर्णी, विभावरी - सुषमा कुलकर्णी, तनुजा - पुनम श्रीरामवार, आत्मती - सिमंतीनी कुंडीकर. या अभिनयांनी समृद्ध संपूर्ण स्रीपात्राचं कुसुम नाट्यगृह, नांदेड या नाट्यगृहात अवघ्या केवळ 15/- रूपयांच्या मोबदल्यात मी दि.2 डिसेंबर 2024 सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता पाहिलेल दोन अंकी हौशी नाट्य स्पर्धेसाठीच होय फक्त महिलांच्या संचाचच हे सेल्फी नाटक 63 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2024 - 25 साठी सहभागी झालेलं हे नाट्य. सेल्फी नाट्य कृतीवर रसिक, श्रोत्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपातील ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार यांचे मनोगत आपल्या लोकनायक मिडिया न्युज नेटवर्कच्या वाचकांच्या माहितीस्तव देत आहोत..!
=================================
"सेल्फी" {दोन अंकी नाट्य छानच द ग्रेट..!} विविध आषयधनाचे अभिनयात साकारलेल प्रबोधन. प्रत्येक भगिणी कलाकारांनी अभिनयात साकारलेल जीवंतपण. अगदीच जीव ओतून साकारलेली खुमासदार अभिनयाची सेल्फी...कुमारिका मातेच मानसिक द्वंद्व, त्या अनुषंगाने गर्भपाताचा प्रश्न. दारू तत्सम नशेचे दुष्परिणाम. आत्महत्या करण्याच्या प्रवर्तीचे वैचारिक दोलायमन. एकत्र कुटूंबातील मी पणामुळे आलेल्या दुराव्याच्या अवस्थेतील मानसिक अस्थिरपण. या नानाविध सामाजिक प्रश्नांला प्रश्नांकित न ठेवता सुसंवादातून टाकलेली प्रबोधनात्मक सकारात्मकता. आपल्या स्वत:च्या जीवनातील प्रश्नांकित दुनिययेला लपवत दुसऱ्याच्या जीवनात डोकावणारी मानसांच्या मनोवृत्तीवर टाकलेला प्रकाशझोत. स्वत:च्या उन्नतीसाठी दुसऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन स्वत:कडे लक्ष देण्याच दाखवलेल औदार्य अशा कितीतरी नानाविध बाबी प्रेक्षकांची मन वेधून टाळयांचा गडगडात करून गेली. एकंदरीत रेल्वे स्टेशनच्या वेटिंगरूम मधिल सेल्फी टिमने रसिक प्रेक्षकांची मने तर जिंकलीच या सोबतच परिक्षकांच्याही गुनग्राहतेत सेल्फी टिम अग्रक्रमाने वृद्धिंगत आलेखांचा यश शिखर गाठेल यात तिळमात्र शंका राहिलेली नाही. विशेष सांगायचे झाल्यास गुलाबीथंडीच्या या मोसमातही सेल्फी या दोन अंकी प्रबोधनानाचा वसा घेवून उतरलेल्या या नाटकाच्या स्पर्धेतील नाटक पाहण्यात रममान झालेल्या जनसागरा मध्ये नेमक्या बोटावर मोजण्या इतक्या रसिकांनी मफलर स्वेटर बाळगलेलं आढळून आले. या अभिनयातील ऊर्जेला मानाचा मुजरा आणि सेल्फी सुपरहिट होण्यासाठी हार्दिक शुभसंकल्प. मी खास अंबाजोगाईहून येवून सेल्फीच्या आनंददायी उत्सवाचा अनुभव दृष्टीपटलावर ठेवून त्यातील आषयधनाचे शब्द परागकण. ह्रदयकमलात साठवू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. या नाटकाला यशप्राप्ती मिळुन अचानक रेल्वे स्टेशनच्या वेटिंग मध्ये भेटलेल्या अनामीक मैत्रींनिंच्या स्नेहाचा गुलकंद होवो हाच हार्दिक शुभसंकल्प. सेल्फीच्या लेखिका, दिग्दर्शक, वेशभुषा, ध्वनी व व्यासपीठ पार्श्वभूमचे संगित व प्रकाश योजना चालवणार्या समूहाच हार्दिक अभिनंदन. तनुजा ही भुमिका साकार करणारी कलाकार अर्थात पुनम पल्लेवार श्रीरामवार या आमच्या भाचीच्या आग्रही निमंत्रणाने हे सेल्फी नाट्य पहाण्याची मिळालेली संधी. पुनम ही श्री व सौ.इंदु तुळशिदासराव पल्लेवार यांची कन्या. तसेच माजी एस.टी.कामगार नेते रधुनाथराव आर.आर / नाना या नांवाने सुपरिचित राहीलेले दिवंगत रघुनाथराव श्रीरामवार यांचे सुपुत्र इंजि.दिपक यांच्या गृहलक्ष्मी. आपली माणसं यशोशिखरावर जातांना मन आनंदाने दुथडी भरून वाहत. पुनम उच्चशिक्षित आहे. बालपनाच्या जडण-घडणचे सुसंस्कार इंद्रायणीच्या कुशित सासवडला झाल्यामुळे वागण्या बोलण्यातून पेशवाईचा मुलायम तरंग. आपल्या आवाज माधुर्याच्या सामर्थ्याने आकाशवाणी परभणीच्या रेडिओ केंद्राच्या रसिक श्रोत्यांच्या मनामनावर गाजवलेलं आधिराज्य..! गोड मधुरतम संवादकलेचा मुलायम धाग्याची विन नाजुकपणे गुंफत आकाशवाणी, परभणीच्या मैत्रीणींनी साकारलेलं शब्द शिल्पांचं रसिकांच्या मनात श्रद्धेय भावनेनं शिल्पीत झालेल मंदिर म्हणजेच सेल्फी हे दोन अंकी नाटक. कुसुम नाट्यगृह, नांदेड..! अफाट रसिक जनसागरात प्रेक्षणीय आनंदाच्या लाटांचा आनंद तरंग निर्माण करणाऱ्या 'सेल्फी' हौशी नाट्यस्पर्धेसाठीच अवघे दोन अंकी नाटक अगदीच प्रेक्षकांना खिळवून प्रबोधनात्मक एकाग्रता साधनारे मध्यंतर होऊच नये असं वाटणारं आणि दोन्ही अंक संपून समाप्तीची घंटा वाजताना रंगमंचाचा पडदा ओढला जात असतांनाही नाट्यगृह आसनस्थ होऊनच राहावं व पुन्हा-पुन्हा वन्स मोअर म्हणून पहावस वाटणार सेल्फी नाटक. सेल्फी नाटकातील प्रबोधनात जानवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हणजे मी पणाला हळुवार सोडचिठ्ठी देत, स्व:अस्तित्वाची जाणीव करून देणारं सकारात्मक प्रबोधन करून देणारं, सर्व सामाजिक प्रश्नांना प्रश्नांकित न ठेवता सकारात्मक उत्तराने प्रश्नांना पूर्ण विराम देत आनंदी जीवनाचा संदेश देत नाटकाचा शेवट गोड करीत रसिकांच्या उस्फूर्त टाळ्यांच्या कडकडात समाप्तीच्या घंटानादात विलीन होत रंगमंचावर मैत्रिणींच्या सेल्फी क्लिकसह पडद्याच्या ओढण्यात अंधारात विलीन होणाऱ्या रंगमंचात ही कलाकारांच्या सुंदर अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनामनात प्रकाशझोत कायम ठेवणारं हे दोन अंकी 'सेल्फी' नाट्य. चांगल्याच सुरूवातीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवून नाट्य अभिनयाच्या क्षेत्रात सर्वोत्तम श्रीगणेशा करणाऱ्या सर्व सेल्फी समुह चमूला कौतुकासह शाब्बासकी आणि पुढील भवितव्य तारांगणाच्या व्यासपीठावर अर्थात नाट्य कलेसह लघु फिल्म मध्ये यशवंत गरूडझेप घेण्यासाठी ह्रदयस्थ शुभसंंकल्प करतो.
- © राजेंद्र रापतवार {कवी} अंबाजोगाई.
====================================
Comments
Post a Comment