पतंजलि योग समितीच्या ७५ शिबिरांतून माजी सैनिक दत्ता लांब यांनी ४५ हजार विद्यार्थ्यांना मोफत योग शिकवला

७५ व्या हिरक महोत्सवी योग विज्ञान शिबिराच्या सांगता समारोहाचे आयोजन ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) सामाजिक बांधिलकी जोपासत शहर व तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातून तब्बल ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागील १० महिन्यांपासून योगाचे मोफत धडे देण्याचे काम माजी सैनिक योग प्रशिक्षक दत्ता सदाशिव लांब यांनी केले आहे. त्यांच्या ७५ व्या हिरक महोत्सवी योग विज्ञान शिबिराच्या सांगता समारोहाचे आयोजन मंगळवारी लोखंडी सावरगाव येथे करण्यात आले होते. पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक माजी सैनिक आयुर्वेदिक चिकित्सक दत्ता लांब यांनी मागील १० महिन्यांहून अधिक काळ तब्बल ७५ निःशुल्क योग शिबिरांचे आयोजन केले आहे. योग दिंडी आपल्या दारी या अभियानांतर्गत पतंजलि योग समिती, अंबाजोगाई व ज्ञानदीप अकॅडमी, लोखंडी सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७५ व्या हिरक महोत्सवी योग विज्ञान शिबिराचा सांगता समारोह मंगळवार, दिनांक २८ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनिता दिदी (अंबाजोगाई सेवा केंद्र संचालिक...