सजग पालकच पाल्यांचे यशस्वी करिअर घडवू शकतो - विकास वाघमारे यांचे प्रतिपादन

सजग पालकच पाल्यांचे यशस्वी करिअर घडवू शकतो - विकास वाघमारे यांचे प्रतिपादन

=================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक सतत चिंतेत असतात. परंतु, आपण एक सुजाण पालक म्हणून यासाठी सुयोग्य असे नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी सदैव सजग राहणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे मास्टर ट्रेनर तथा उपक्रमशिल शिक्षक विकास वाघमारे यांनी येथील स्पोकन इंग्लिश हब व व्यक्तिमत्व विकासासाठी नामांकित असलेले आई सेंटर प्रो, संत सावतामाळी नगर, अंबाजोगाई येथे खास पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेत केले.  

यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक तथा विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे - संचालक आई सेंटर प्रो, आई सेंटर प्रो, पुणेच्या कॉर्पोरेट मॅनेजर अल्पा पांडे, इंग्लिश विंग्ज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या स्वाती वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे यांनी सांगितले की, या २१ व्या शतकातील तरूण व तरूणी हे अतिशय महत्त्वकांक्षी व स्वयंप्रेरित असल्यामुळे त्यांना आजच्या या विज्ञान तसेच माहिती व तंत्रज्ञान युगात स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता ठेवून आहेत. सोबतच चांगली शाळा व महाविद्यालय तसेच गुरूजन वर्ग यांच्यामुळे आपल्या पाल्याचा आत्मविश्वास वाढत असल्यामुळे त्यांनी घेतलेल्या करिअरच्या निर्णयावर आपण ही त्यांना योग्य असे प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यासाठी बळ देणे आवश्यक असल्याचे सांगितले व पालकांना त्यांच्या पाल्याचे उत्तुंग यश मिळविण्यासाठीच्या प्रवासात स्वतः एक सजग पालक म्हणून संयम ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना वाघमारे यांनी स्वानुभवातून समर्पक उत्तरे देऊन मंत्रमुग्ध केले. पालक सभेच्या सुरूवातीला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी उत्स्फूर्तपणे आई सेंटर प्रो येथे प्रशिक्षणासाठी स्पोकन इंग्लिश, इंग्रजी ग्रामर, व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच दहावी, बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या त्यांच्या पाल्यांच्या दिवसागणिक होत असलेल्या प्रगतीप्रती समाधान व्यक्त करीत आई सेंटर प्रो चे संचालक नागेश जोंधळे व संपूर्ण टीमचे अभिनंदन तसेच ऋण व्यक्त केले. यावेळी आई सेंटरच्या प्रशिक्षणामुळे अगदी बालवयापासूनच स्वतःचा आत्मविश्वास वाढवून दहावी बारावी तसेच एमबीबीएस मध्ये उत्तुंग यश प्राप्त करून आज पुणे व मुंबई येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सोबतच एमडी नीट ची तयारी करत असलेले डॉ.शुभदा वर्षा सोमनाथराव विभुते व डॉ.उत्तरेश्वर पुष्पा अनंतराव दहिफळे यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध लेखक नागेश जोंधळे लिखित महाराष्ट्रातील तसेच भारतातील प्रत्येक व्यक्तीला लाखो इंग्रजी वाक्य लिहिता व बोलता येण्यासाठीचे सर्वाधिक खपाचे द बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स हे पुस्तक देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. पालक सभेच्या यशस्वितेसाठी आई सेंटर प्रो चे प्रशिक्षक प्रतीक गौतम, शिवमाला घोडके व सर्व फॅमिली मेंबर्स यांनी परिश्रम घेतले.


================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड