पंकजाताई मुंडे यांच्या विजयाचा निर्धार ; ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पोखरकर यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला
पंकजाताई मुंडे यांच्या विजयाचा निर्धार..!
ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पोखरकर यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला
==========================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी युवकांची फळी अधिक सक्रिय केली आहे. अंबाजोगाई येथील युवक कार्यकर्ते विनोद सिद्राम आप्पा पोखरकर यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली केज विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात खेडोपाडी, डोअर-टू-डोअर जावून पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
केज विधानसभा मतदारसंघात आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांनी प्रचाराची वज्रमुठ अवळली असल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाई, केज तालुक्यांसह नेकनूर पर्यंत भाजपातील सर्वांना सोबत घेऊन प्रभावी प्रचार यंत्रणा उभी केली आहे. आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेवरून विनोद पोखरकर यांनी केज विधानसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून जनसंपर्क व जनसंवाद कायम ठेवला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ सर्वसामान्य जनतेच्या घराघरात कमळ हे चिन्ह पोहचून पंकजाताई मुंडे यांच्या विजयाचा संकल्प केला आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. त्यांना लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. केज मतदारसंघातील मतदारांनी विजयाचा निर्धार केला असून, लोकसभा निवडणूक ही नुसती निवडणूक नसून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची चळवळ आहे असे समजून, तळागाळातील सर्वसामान्य जनतेने विकासाच्या दृष्टीने मतदानरूपी आशिर्वाद पंकजाताई यांना देवून भाजपाला समर्थन द्या असे आवाहन भाजपचे युवक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी केज विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे. विनोद पोखरकर यांच्या सोबत बसवेश्वर यादव, बलभीम धारेकर, सुरज बनाळे, साहिल नाळकर, राजु स्वामी, वैभव पोखरकर, शुभम वारद, प्रसाद कोठाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
संत शिरोमणी मन्मथ स्वामींना साकडे :
बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयासाठी आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवयोगी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. विधीवत पूजा, अर्चा केली. प्रार्थना केली.
- विनोद पोखरकर (युवक कार्यकर्ते भाजपा)
==================================
Comments
Post a Comment