Posts

स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव सन्मानित

Image
चंदनशिव यांच्या कथेने नवी दृष्टी देत गावगाडा, कृषिजन कवेत घेवून नैतिकता जोपासली - प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस ========================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) भास्कर चंदनशिव यांच्या व्यक्तिमत्त्वावर अंबाजोगाईच्या संस्कारांचा प्रभाव आहे. त्यांचे लोमटे बापू आणि अंबाजोगाईवर नितांत प्रेम आहे. म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते, ओव्या हे ज्ञान संक्रमणाचे शास्त्र आहे. यातून तत्कालीन कृषि समाजाने संदेश दिलेला आढळतो. मराठी साहित्य गावखेड्यात नेण्याचे काम चंदनशिव यांनी केले. त्यांच्या साहित्यात बोलीभाषेचा सहज व विपुल वापर आढळतो. त्यामुळे ते संपूर्ण गावगाड्याचे लेखक आहेत. मापदंड आहेत. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी, चंदनशिव यांची कथा आहे. त्यांच्या कथेने वाचकांना नवी दृष्टी दिली. गावगाडा, कृषिजन कवेत घेवून नैतिकता जोपासली, चंदनशिव यांनी आयुष्यात कुठलीच तडजोड न करता, प्रसिद्धीसाठी मुंबई, पुणे याला प्राधान्य न देता कळंब येथे राहून नव्या पिढीला बाणेदारपणा शिकवला, मराठी साहित्यात चंदनशिव यांचा आदरयुक्त धाक आहे. असे गौरवोद्गार काढून प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस...

अंबाजोगाईत १७ सप्टेंबर रोजी स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

Image
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांची माहिती  ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व.भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथा, कादंबरीकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत लिखाण करणारे प्रा.भास्कर चंदनशिव (कळंब) यांना आज प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आंबेजोगाई येथील राजकारणी, समाजकारण, साहित्य, संस्कृती, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले स्व.भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास हा पुरस्कार स्वर्गीय भगवानराव लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. या वर्षीचा ११ वा पुरस्कार ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस (कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. रविवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद...

पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार

Image
सहकार अधिकारी विलासराव मोरे यांच्या हस्ते पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांना नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान  ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) शहरालगत सर्व सोयी - सुविधांनी परिपूर्ण असलेल्या पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांचा शनिवार, दिनांक 2 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यप्रवर्तक सुनिल शिवाजी मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर सहकार विभागाचे अधिकारी विलासराव मोरे, कचरूलाल सारडा, नितीन बाहेती, कन्हैय्या सारडा, व्यवस्थापक अमितकुमार वर्मा यांच्यासह पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सहकार विभागाचे अधिकारी विलासराव मोरे यांच्या हस्ते पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांना नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. तर यावेळी बोलताना कचरूलाल सारडा यांनी सांगितले की, पिताजी सारडानगरी हा सर्व सोयी - सुविधांनी युक्त,...

रक्षाबंधनासाठी वैदिक राख्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचा अभिनव उपक्रम

Image
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांची माहिती ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) तालुक्यातील वरवटी येथील श्री संत भगवान बाबा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेने मागील काही वर्षांपासून रक्षाबंधनासाठी पर्यावरणपूरक व आकर्षक अशा वैदिक राख्या तयार केल्या आहेत. यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा मौलिक संदेश ही देण्यात आला आहे. अशी माहिती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी दिली आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी व गो-सेवा गतीविधी, देवगिरी प्रांत यांच्या विधायक सूचनांप्रमाणे तसेच गो-शाळेतील गायींचे संगोपनासाठी गो-शाळा स्वावलंबी बनणे गरजेचे आहे. देश-देव अन् धर्मासाठी गो-आधारीत विविध जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करून गो-शाळा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच विचाराला बळ देण्यासाठी मागील काही वर्षांपासून रक्षाबंधनासाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक अशा “वैदिक राख्या” तयार केल्या ...

एक राखी फौजी भाई के नाम..! - संकल्प विद्या मंदिर शाळेचा प्रेरक व कौतुकास्पद उपक्रम

Image
विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी - मुख्याध्यापिका सौ.रेखाताई बडे  ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) भारत देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देवून व डोळ्यांत तेल घालून ऊन-वारा-पावसांत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करून देशसेवा करीत असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकल्प विद्या मंदिर यांच्या वतीने "एक राखी फौजी भाई के नाम" हा अनोखा, नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. भारतीय सैनिकांसाठी 225 'इको फ्रेंडली' राख्या व त्यासोबत एक शुभेच्छा संदेश पत्र तयार करून नुकतेच पाठविण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील संकल्प विद्या मंदिर येथे बुधवार, दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी हा अनोखा उपक्रम यशस्विरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थिनींनी स्वदेशी राखी स्वतःच्या हाताने तयार करून भारतीय सैनिकांबद्दल आपल्या सद्भावना शुभेच्छा संदेश पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. गुरूवार, दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी गुजरात युनिट येथे तैनात असलेल्या सैनिकांना ...

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करा ; तात्काळ अग्रीम रक्कम द्या - भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव आपेट यांची मागणी

Image
बीड जिल्ह्यात सलग 25 दिवसांहून अधिक काळ झाला नाही समाधानकारक पाऊस  ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) बीड जिल्ह्यात सलग 25 दिवसांहून अधिक काळ समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. खरीपाची पीके पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशा संकटात त्यांना आधार देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून विमा कंपनीस बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विमा मंजूर करून, तात्काळ अग्रीम रक्कम देण्यास आदेशित करावे अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव आपेट यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावर्षी पावसाळ्याच्या जून महिन्यापासूनच बीड जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. सुरूवातीला पाऊस नव्हता म्हणून पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग 25 दिवसांहून अधिक काळ उघडीप दिली. तसेच 24 जूलै ते 26 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात कुठेच म्हणावा तसा पाऊस पडला नाही. परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के एवढाच पाऊस...

अंबाजोगाईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली युवा स्वतंत्रता ज्योत रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीत आ.रोहितदादा पवार, युवा नेते रोहित पाटिल यांचा ही रॅलीत प्रेरक सहभाग ========================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) समाजात राष्ट्रभक्ती, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा बळकट व्हावी. या उद्देशाने अंबाजोगाईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत युवकांसह विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग असतो. तो यावर्षी ही होता. "वंदे मातरम्, भारत माता की जय" या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आ.रोहितदादा पवार, युवा नेते रोहित आर.आर.पाटील (तासगांव) यांचा ही रॅलीत सहभाग होता. मागील सोळा वर्षांपासून डॉ.नरेंद्रजी काळे यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई शहरात युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी या रॅलीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ झाला. ही रॅली कुत्तरविहीर, मंडीबाजार, गुरूवारपेठ, गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे...