अंबाजोगाईत १७ सप्टेंबर रोजी स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांची माहिती 

========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)


यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व.भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथा, कादंबरीकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत लिखाण करणारे प्रा.भास्कर चंदनशिव (कळंब) यांना आज प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.



यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आंबेजोगाई येथील राजकारणी, समाजकारण, साहित्य, संस्कृती, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले स्व.भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास हा पुरस्कार स्वर्गीय भगवानराव लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. या वर्षीचा ११ वा पुरस्कार ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस (कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. रविवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पुरस्कार प्रदान समारंभ होईल माहिती दगडू लोमटे यांनी दिली. या कार्यक्रमास सर्व नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन, यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)