पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार
सहकार अधिकारी विलासराव मोरे यांच्या हस्ते पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांना नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान
========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे
(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
शहरालगत सर्व सोयी - सुविधांनी परिपूर्ण असलेल्या पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांचा शनिवार, दिनांक 2 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यप्रवर्तक सुनिल शिवाजी मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर सहकार विभागाचे अधिकारी विलासराव मोरे, कचरूलाल सारडा, नितीन बाहेती, कन्हैय्या सारडा, व्यवस्थापक अमितकुमार वर्मा यांच्यासह पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सहकार विभागाचे अधिकारी विलासराव मोरे यांच्या हस्ते पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांना नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. तर यावेळी बोलताना कचरूलाल सारडा यांनी सांगितले की, पिताजी सारडानगरी हा सर्व सोयी - सुविधांनी युक्त, प्रशस्त, पर्यावरणपूरक, भव्य, दर्जेदार असा परिपूर्ण गृहप्रकल्प आहे. योगेश्वरी नगरी प्रकल्पाचे मार्गदर्शक एस.आर.कन्स्ट्रक्शनचे प्रमुख शिवप्रसाद लाहोटी (बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन बाहेती व मी कचरूलाल सारडा आम्ही एकत्र येऊन हा गृहप्रकल्प सन - 2018 ला स्थापन केला, गुणवत्ता आणि दर्जेदारपणा जोपासत उभा केला आहे. पिताजी सारडानगरी हा (फेज - 1, फेज - 2 व फेज - 3) रचना असलेला गृहप्रकल्प आहे. यात चांगल्या सोयी - सुविधा, आधुनिक सेवा, प्रशस्त रस्ते, नाल्या, पर्यावरणपूरक गार्डन, मुबलक पाणी व वीज उपलब्ध आहे. (फेज - 1, फेज - 2 व फेज - 3) मधील रहिवासी यांनी एकत्र येऊन संचालक मंडळ ठरविले. परंतु, त्यांच्यात पदाधिकारी निवडी बाबत मात्र एकमत होत नव्हते. त्यामुळे पदाधिकारी निवडण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली. त्यानुसार मी, आज पिताजी सारडानगरी (फेज - 1, फेज - 2 व फेज - 3) च्या सर्व सन्माननिय रहिवासी बांधवांच्या वतीने पदाधिकारी निवडी जाहीर करीत असल्याचे सारडा यांनी सांगितले. त्यानुसार पिताजी सारडानगरी (फेज - 1, फेज - 2 व फेज - 3) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी अमोल चंद्रसेन आनवणे, उपाध्यक्षपदी पंडित नामदेवराव फुंदे, सचिवपदी अर्चना मन्मथ धारेकर तर कोषाध्यक्ष म्हणून राजेंद्र नागनाथ कांबळे यांच्यासह संचालक मंडळात संतोष साहेबराव मुंडे, ऍड.व्ही.डी.शिंदे, सुर्यकांत सिद्राम बंडगर, स्वप्नाली नितेश शिराळे, सुनिल शिवाजी मस्के, अमोल अशोक कुलथे, राजेश्वर गणपत स्वामी, वासुदेव ज्ञानोबा पाखरे, शुभम दत्तात्रय महात्मे, जयश्री शिवाजीराव राख, ज्योतीबाई देविदास शिंदे यांचा समावेश आहे. नुतन पदाधिकारी व संचालकांचा फेटा बांधून आकर्षक भव्य गुलाब पुष्पहार घालून, शाल व श्रीफळ देऊन कचरूलाल सारडा, नितीन बाहेती, अभियंता कन्हैय्या सारडा, व्यवस्थापक अमितकुमार वर्मा, सुभाषराव नागरे, अतुल निकम, अभियंता सय्यद नाजेस, कल्याण दहिफळे, अन्नुभाई, सौ.शिवांगी अमित वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुतन पदाधिकारी व संचालकांच्या निवडीचे उपस्थित रहिवासी बांधवांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात मान्यता देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रापतवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार व्यवस्थापक अमितकुमार वर्मा यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार, पिताजी सारडानगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व सन्माननिय सभासद, महिला भगिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस.आर.कन्स्ट्रक्शन (बीड) व पिताजी सारडानगरी (फेज - 1, फेज - 2 व फेज - 3) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
========================
Comments
Post a Comment