Posts

Showing posts from August, 2024

कै.वसंतराव नाईक आश्रमशाळेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन

Image
कै.वसंतराव नाईक आश्रमशाळेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार समोर ठेवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्ज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत शाळेतील विद्यार्थीनी यांनी स्वागतपर गीताने केले. या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन शासनाकडून कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजना सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोंचल्या पाहिजेत. या उद्देशाने या योजनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी करण्यात आले होते. या मेळाव्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठीच्या आश्रमशाळा, विद्यानिकेतन शाळा, गुणवंत मुला-मुलींसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, इतर मागास विद्यार्थ्...

पुस येथील साळवे परिवाराने रक्षा विसर्जीत न करता वृक्षारोपनाने केले आईंच्या स्मृतींचे जतन

Image
पुस येथील साळवे परिवाराने रक्षा विसर्जीत न करता वृक्षारोपनाने केले आईंच्या स्मृतींचे जतन ==================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) तालुक्यातील पुस येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांच्या आईंचे नुकतेच दुःखद निधन झाले. रक्षा सावडण्याच्या दिवशी पारंपरिक प्रथेला थारा न देता पर्यावरणपूरक बाबीला प्राधान्य दिले. रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आईची स्मृती जागरूक ठेवण्यासाठी स्मशानभूमी परीसरात वृक्षारोपाची लागवड केली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. ग्रामीण भागामध्ये मृत्यूनंतर मृतदेहाला भडाग्नी दिल्यानंतर उर्वरीत अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी त्या-त्या धर्मातील परंपरेनूसार विधी करण्याची, एखाद्या तीर्थस्थळावर जाण्याची नातलगांची भावना असते. तालुक्यातील पुस येथे साळवे कुटुंबियांनी जलप्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन पारंपरिक प्रथेला फाटा देत आईच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन न करता याच राखेचा उपयोग करून स्मशानभूमी परीसरात एक वृक्षरोप लागवड करून रक्षा विसर्जित करण्यात आली. यानिमित्ताने आपल्या मायमाऊलीच...

खासदार बजरंग बप्पांचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल..!

Image
खासदार बजरंग बप्पांचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल..! तीन गावातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान बँकेत जमा ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांची कामे तातडीने मार्गी लावा. त्यांची अडवणूक करू नका. प्रशासनातील अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असतील तर हे योग्य नाही. जे पद आपल्या मिळाले, ते पद जनतेच्या कामी येणे अपेक्षित आहे. कारण, अंबाजोगाई तालुक्यातील काही गांवातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान त्यांना अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात खा.बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई तहसीलदार यांना फोन करून शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न जिथल्या तिथे मार्गी लावला आहे. त्यामुळे खासदार बप्पांचा एक फोन कॉल अन् प्रॉब्लेम सॉल. असे म्हणत शेतकऱ्यांनी खा.बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील भारज , गित्ता आणि पोखरी येथील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे तेथील काही शेतकऱ्यांनी खा.बजरंग सोनवणे यांच्या अंबाजोगाई येथील संपर्क कार्यालयात अनुदान संदर्भात व्यथा मांडली होती.तसेच खा.बजरंग...

२५ ऑगस्ट रोजी वर्धा येथे बामसेफचे ३८ वे राज्य अधिवेशन

Image
२ ५ ऑगस्ट रोजी वर्धा येथे बामसेफचे ३८ वे राज्य अधिवेशन ;  राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) महाराष्ट्र बामसेफचे ३८ वे राज्य अधिवेशन या वर्षी वर्धा येथे रविवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सरोज मंगलम, राष्ट्रभाषा रोड, सानेवाडी येथे होत आहे. या महत्वपुर्ण अधिवेशनाचे अध्यक्ष बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनजी मेश्राम हे आहेत. तर या अधिवेशनाचे उद्घाटक नागपूर येथील संविधान तज्ज्ञ देविदास घोडेस्वार हे असतील. तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राज्य सचिव डॉ.मोहन मिसाळ व जिल्हाध्यक्ष आर.डी.वैरागे यांनी केले आहे. सदरील अधिवेशनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत असेल. हे अधिवेशन तीन सत्रात होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय, राज्य स्तरावरील ज्वलंत अशा विविध ८ विषयांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील २१ विद्वान,अभ्यासक वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. याअधिवेशनात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक बाबींवर वैचारिक मंथन होणार आहे. या तिनही...

शंभर टक्के पिक विमा द्या ; शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा - संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे

Image
शंभर टक्के पिक विमा द्या ; शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा - संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) सन २०२३ चार प्रधानमंत्री पिक विमा मंजूर करून तो सरसकट देण्यात यावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, ई-पिक पाहणी अट रद्द करा आणि सन २०२० चा पिक विमा द्यावा अशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडने हा विषय लावून धरला आहे. पाठपुरावा सुरू ठेवला आहे.  संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना १६ ऑगस्ट रोजी तर तालुका कृषी अधिकारी यांना २० ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ पडला आहे. १४ जुलै नंतर रिमझिम पाऊस पडला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी बळेच पेरणी केली. जुन ते सप्टेंबर महिन्यात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ पडला आहे. खर...

नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.केशव राऊत यांची नियुक्ती

Image
नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष डॉ.केशव राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.केशव पांडुरंगराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांच्या निवडीचे समाजाच्या वतीने स्वागत होत आहे. नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान आण्णा बिडवे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष विकास भाऊ काळे व अंबाजोगाई तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे यांनी येथील डॉ.केशव पांडुरंगराव राऊत यांची नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्रात नमूद केले आहे की, आपण अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय आहात. आपणांस सामाजिक कार्याचा अनुभव असल्यानेच आपण नाभिक समाजाचे सरकारी, निमसरकारी, शैक्षणिक तसेच इतर सर्व क्षेत्रातील कर्मचारी, कामगार व शिक्षक यांना एकत्रित करून नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे रचनात्मक संघटन उभाराल ही अपेक्षा आहे. राज्य व देश पातळीवर नाभिक समाज संघटीत करण्याचे कार्य नाभिक एकता म...

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी हरीश वाघमारे यांची फेरनिवड

Image
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी हरीश वाघमारे यांची फेरनिवड हरीश वाघमारे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत  =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी हरीश वाघमारे यांची फेरनिवड तर यावेळी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवार, दिनांक १७ ऑगस्ट रोजी करण्यात आल्या. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे, मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील कुणबी मराठा सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश वाघमारे यांनी कोविडच्या लॉकडाऊन काळात पुरवठा विभागाकडून गरजू लोकांना धान्य उपलब्ध करून दिले. नाभिक समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन मोफत रेशनसाठी लागणारी कागदपत्रे जमा करून ती ऑनलाइन करून दिली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांना...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अमोल चव्हाण यांची नियुक्ती

Image
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अमोल चव्हाण यांची नियुक्ती अमोल चव्हाण यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत =================================== बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अमोल सत्यनारायण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत करण्यात येत आहे. देशाचे ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमोल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार या पक्षात जाहीर प्रवेश केला केला होता. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली. तरूणांना संघटित करून पक्षाची ताकद वाढवली. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ...

आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृतीनिमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" वितरण

Image
तपसे बंधूंची बांधिलकी : मोठ्या बहिणीच्या प्रेरक स्मृतींना उजाळा आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृतीनिमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" वितरण कु.सुप्रिया तपसे, कु.माधवी तपसे व कु.ज्योती तपसे या विद्यार्थीनी मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी ================================== केज (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनी लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात मिराई प्रतिष्ठान आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलींना आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृतीनिमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" वितरण करण्यात आले. प्रतिवर्षी मिराई प्रतिष्ठान हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. यावर्षी कु.सुप्रिया शंकर तपसे, कु.माधवी उत्रेश्वर तपसे व कु.ज्योती दिपक तपसे या विद्यार्थीनी मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी ठरल्या आहेत. याही वर्षी तपसे बंधुनी आपल्या मोठ्या भगिनी मार्गदर्शिका ज्यांनी आयुष्यभर महिलांसाठी सामाजिक, शैक्षणिक कार्य करीत समाज उभारणीचे कार्य करून आपल्या अल्प आयुष्यात महिलांना स्वता: र...

संकल्प विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Image
संकल्प विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन  स्वातंत्र्य टिकवा, संविधानाच्या माध्यमातून देशसेवा करा - ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारे नृत्य प्रकार सादर ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने संकल्प विद्या मंदिर प्रशांतनगर, अंबाजोगाई येथे स्वातंत्रता दिनानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या लक्षणिय सहभागाने स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाराष्ट्र गीत घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी गटशिक्षण अधिकारी कार्यालय येथे कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विचारमंचावर माजी नगरसेवक सुरेशदादा कराड, संस्थेचे सचिव कैलास चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांकडून भारतरत्...

विनम्र अभिवादन... केज विधानसभा मतदार संघाच्या भाग्यविधात्या स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! अभिवादक - प्रदिप मधुकरराव ठोंबरे

Image
  विनम्र अभिवादन... केज विधानसभा मतदार संघाच्या भाग्यविधात्या स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🌹🌹🌹🌹🌹 अभिवादक - प्रदिप मधुकरराव ठोंबरे (Advt.)

महामानव बाबासाहेबांमुळे झालेले सामाजिक बदल आण्णा भाऊंनी साहित्यातून मांडले - विचारवंत प्रा.डॉ.सोमनाथ कदम

Image
महामानव बाबासाहेबांमुळे झालेले सामाजिक बदल आण्णा भाऊंनी साहित्यातून मांडले - विचारवंत प्रा.डॉ.सोमनाथ कदम सत्यशोधक डॉ.आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त युवा आंदोलनचा उपक्रम व्याख्यान, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य वाटप ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) येथील युवा आंदोलन सामाजिक संघटनेकडून सत्यशोधक डॉ.आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचे प्रबोधनपर व्याख्यान, गुणवंतांचा सत्कार आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी विलासराव देशमुख सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास उदघाटक म्हणून उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार विलास तरंगे आणि प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशांत दहिफळे (सरपंच, बागझरी), हनुमंत गायकवाड (माजी सरपंच, तळणी), संतोष नरसिंगे (संचालक, महानिता ग्रुप), धीमंत राष्ट्रपाल (बेटी बचाव अभियान), बळीरा...

बीड जिल्ह्यात वाढला कॉंग्रेसचा जनाधार ; तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

Image
बीड जिल्ह्यात वाढला कॉंग्रेसचा जनाधार ; तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख परळीची जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी राज्य प्रभारी व प्रदेशाध्यक्षांकडे कार्यकर्त्यांची मागणी ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने लातूर या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनेची सध्याची स्थिती, बूथ बांधणी, बीएलए, फ्रंटल, सेलचा आढावा घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी अतिशय प्रभावी आणि सकारात्मक पध्दतीने बीड जिल्ह्याची बाजू मांडत जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी बीड जिल्ह्यात कॉंग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत बीड, गेवराई, केज आणि परळी यापैकी तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसच्या वतीने दावा करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने परळी मतदारसंघ काँ...

केज येथील योगिता रूग्णालयात ११ दिवसाच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

Image
केज येथील योगिता रूग्णालयात ११ दिवसाच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) विकासापासून शेकडो कोस दुर असलेल्या केज येथील योगिता नर्सिंग होम व बोल रूग्णालयात १२ दिवसांच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करून बाळाला जीवनदान देण्यात डॉ.दिनकर राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे. केज सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात आव्हान असणारी ही अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉ.दिनकर राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील युसुफवडाव या गावातील एका महिलेची नॉर्मल प्रसुती अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व स्त्रीरोग निदान विभाग झाली होती. प्रसुतीनंतर बाळ व बाळांतीन सुखरूप असल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र बाळाच्या जन्मानंतर पाच-सहा दिवसांनी त्याला अपचन व लुटीचा त्रास सुरू झाला. हा त्रास सुरु झाल्यानंतर बाळाच्या पालकांनी कळंब येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू केले,...

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)

Image
  जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सावळे परब्रम्ह श्रीहरि विठ्ठल भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवन  प्रवासावर वाचन, श्रवण व मनन चिंतनातून साकारलेल्या साहित्याचे संक्षिप्त रसग्रहण, समिक्षणाचे शब्दांकन ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार यांनी नेमक्या शब्दांत केले आहे. ते वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ संत शिरोमणी नामदेव महाराज हे जातीभेद न मानणारे संत होते. जनाबाई सारख्या सामान्य कुटुंबातील महिलेला त्यांनी आश्रय दिला. कुटुंब सदस्याप्रमाणे सन्मान ही दिला. जनाबाईंच्या अंगी असलेल्या भक्ति रचनेच्या ओढीला अधोरेखित करून त्यांना शिष्यत्व ही बहाल केले. या सत्संगामुळे त्या संत जनाबाई म्हणून पुढे ओळखल्या गेल्या. ईश साधनेच्या शिव आणि विष्णू भक्तांतील दुरावा त्यांनी नाहिसा करून हरहर व सांब भक्तीत एकसंघ केले. पंजाब शिख बांधवांना ही भगवद् भक्तीत समरस केले. जातीभेदाला तिलांजली देतांना, जनमानसांत समता बिंबवताना संत नामदेवांनी आपल्या श...