संकल्प विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
स्वातंत्र्य टिकवा, संविधानाच्या माध्यमातून देशसेवा करा- ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण
विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारे नृत्य प्रकार सादर
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने संकल्प विद्या मंदिर प्रशांतनगर, अंबाजोगाई येथे स्वातंत्रता दिनानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या लक्षणिय सहभागाने स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाराष्ट्र गीत घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी गटशिक्षण अधिकारी कार्यालय येथे कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विचारमंचावर माजी नगरसेवक सुरेशदादा कराड, संस्थेचे सचिव कैलास चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला. अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमधील ग्रुप एक मधून कु.किंजल बालासाहेब तुपसमुद्रे, ग्रुप बी मधून कु.सानवी राजेंद्र गुट्टे, ग्रुप सी मधून अपेक्षा अण्णासाहेब थोरात या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व शाळेचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमधील ग्रुप ए मधून चि.राजवीर शरद गंगणे, ग्रुप बी मधून कु.आनंदी सुधाकर गजाकोश, ग्रुप सी मधून चि.प्रणव हनुमंत बडे या स्पर्धेतील ही विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आदर्श मुलाखत मधील प्रत्येक वर्गांमधून एका विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला तसेच ग्रुप मधून निवड झालेले ग्रुप ए मधून कु.शरयू कैलास चोले (प्रथम), कु.भूमिका बिजयसिंग भाबरदोडे प्रथम ग्रुप बी मधून चि.स्पंदन राजेश्वर स्वामी (प्रथम), कु.केंद्रे प्रगती सुधाकर (प्रथम) दोन्ही ग्रुपमधील विद्यार्थ्यांना तब्बल स्वतंत्रपणे २०,१५१/- रूपयांची रोख पारितोषिके व शाळेचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व पालकांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कौशल्य निर्माण होतील असे उद्गार पालकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक सुरेशदादा कराड यांनी मोजक्या शब्दांत अनमोल असे मार्गदर्शन करून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर यावेळी अध्यक्षीय समारोप करीत असताना श्रीमती पठाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घ्या, यश संपादन करा असे आवाहन करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. संकल्प विद्या मंदिर ही शाळा सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. हर घर तिरंगा हे अभिनंदनिय अभियान आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य, संविधानाचे महत्व पटवून दिले. विविध गोष्टींतून देशसेवा करण्यात येते. याची विविध उदाहरणे देऊन संवाद साधला, आपले घर, परीसर स्वच्छ ठेवा, वृक्षसंवर्धन करा, अन्नाची नासाडी करू नका, नेहमी सत्य बोला असे सांगून संकल्प विद्या मंदिर शाळा सातत्याने राबवित असलेल्या विविध उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना देत असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पी.एच.नायक यांनी तर उपस्थितांचे आभार श्रीमती घाडगे मॅडम यांनी मानले. देशभक्तीपर व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
=================================
Comments
Post a Comment