आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृतीनिमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" वितरण

तपसे बंधूंची बांधिलकी : मोठ्या बहिणीच्या प्रेरक स्मृतींना उजाळा

आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृतीनिमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" वितरण

कु.सुप्रिया तपसे, कु.माधवी तपसे व कु.ज्योती तपसे या विद्यार्थीनी मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी

==================================

केज (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनी लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात मिराई प्रतिष्ठान आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलींना आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृतीनिमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" वितरण करण्यात आले. प्रतिवर्षी मिराई प्रतिष्ठान हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. यावर्षी कु.सुप्रिया शंकर तपसे, कु.माधवी उत्रेश्वर तपसे व कु.ज्योती दिपक तपसे या विद्यार्थीनी मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी ठरल्या आहेत.

याही वर्षी तपसे बंधुनी आपल्या मोठ्या भगिनी मार्गदर्शिका ज्यांनी आयुष्यभर महिलांसाठी सामाजिक, शैक्षणिक कार्य करीत समाज उभारणीचे कार्य करून आपल्या अल्प आयुष्यात महिलांना स्वता: राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सुरू करून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करणे असो की, बचत गटांची संकल्पना महिलांच्या मनात रूजविणे यातून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. मुळातच कुटुंबातील शैक्षणिक वातावरणात वाढलेल्या आणि आपल्या आई - वडिलांचे शिक्षणाबाबत असलेले सकारात्मक विचार आंगी आत्मसात करून आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देऊन शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकलव्य पुरस्कारसह अनेक शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळवत उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून आपल्या कारकीर्दीत यशस्वी शिक्षिका म्हणून ज्यांनी कार्य केले. सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय, गोटेगाव शाळेच्या माध्यमातून अविरत १४ वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा सतत प्रयत्न करीत एक आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवत ज्ञानदानाचे कार्य ज्यांनी केले अशा आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या प्रेरणादायी प्रवासाच्या पाऊलखुणा तेवत ठेवण्याचे कार्य आपल्या मोठ्या बहिणीच्या नांवे गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशिप सुरू करून भावांनी बहीणीच्या प्रेरणादायी स्मृतींना डोळ्यांसमोर ठेवून स्थापन केलेल्या "मिराई प्रतिष्ठान" आयोजित गुणवंत विद्यार्थीनींना "मिराई स्कॉलरशिप - २०२४" चे वितरण लालबहादूर शास्त्री विद्यालय, चंदनसावरगाव येथील मुख्याध्यापक दिलीप देशमुख, सहशिक्षक बालासाहेब मदन तपसे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व आयोजक महेश शिवदास तपसे मिराई प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते स्कॉलरशिपच्या यावर्षीच्या मानकरी प्रथम क्रमांक कु.तपसे सुप्रिया शंकर स्कॉलरशिप पाच हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक कु.तपसे माधवी उत्रेश्वर स्कॉलरशिप तीन हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक कु.तपसे ज्योती दिपक स्कॉलरशिप दोन हजार रूपये व सन्मानचिन्ह देऊन गुणवंत विद्यार्थीनींना गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून चंदनसावरगावचे सरपंच जालिंदर दळवी, उपसरपंच शंकर तपसे, सेवा सोसायटीचे चेअरमन संजयकुमार तपसे, मा.सरपंच शत्रुघ्न तपसे, उत्तरेश्वर विष्णू तपसे, धर्मराज तपसे, नामदेव मगर व शाळेतील सर्व विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक, सर्व गावकरी यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार आयोजक महेश शिवदास तपसे यांनी मानले व सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश अरविंद तपसे, सुरज शेंडगे, विशाल तपसे, अशोक धपाटे, कृष्णा नखाते यांनी पुढाकार घेतला. तर गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला.

==================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)