खासदार बजरंग बप्पांचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल..!

खासदार बजरंग बप्पांचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल..!

तीन गावातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान बँकेत जमा

==================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांची कामे तातडीने मार्गी लावा. त्यांची अडवणूक करू नका. प्रशासनातील अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असतील तर हे योग्य नाही. जे पद आपल्या मिळाले, ते पद जनतेच्या कामी येणे अपेक्षित आहे. कारण, अंबाजोगाई तालुक्यातील काही गांवातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान त्यांना अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात खा.बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई तहसीलदार यांना फोन करून शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न जिथल्या तिथे मार्गी लावला आहे. त्यामुळे खासदार बप्पांचा एक फोन कॉल अन् प्रॉब्लेम सॉल. असे म्हणत शेतकऱ्यांनी खा.बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील भारज , गित्ता आणि पोखरी येथील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे तेथील काही शेतकऱ्यांनी खा.बजरंग सोनवणे यांच्या अंबाजोगाई येथील संपर्क कार्यालयात अनुदान संदर्भात व्यथा मांडली होती.तसेच खा.बजरंग बप्पा सोनवणे अंबाजोगाई येथील भारज, गित्ता, पोखरी या गावांच्या दौऱ्यावर असतांना येथील काही शेतकऱ्यांनी अनुदान बाबतीत कैफियत मांडली होती. शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदान बाबतीत खा.बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई तहसीलदार यांना फोनद्वारे शेतक-यांच्या अनुदानाबद्दल लवकरात लवकर जमा करण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानंतर तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यास सुरुवात केली आहे.बीड जिल्ह्याला शेतकरी पुत्र खमक्या खासदार लाभला त्यामुळे सर्व सामान्यांचे कामे जिथल्या तिथे मार्गी लागत आहेत. त्यामुळे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कामावर जनता जाम खुश आहे. दरम्यान पाटोदा तालुक्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी. या मागणीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खासदार बजरंग सोनवणे तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा लोकभावना व्यक्त होत आहेत.

==================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)