Posts

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या, अभिमन्यू फड यांच्यावरील हल्ल्याचा अंबाजोगाईत निषेध

Image
आरोपीस कडक शासन व्हावे मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पत्रकारांची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने गटतट विसरून अंबाजोगाईत पत्रकारांचा निदर्शनात उस्फुर्त सहभाग ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क) राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या, परळी येथील पत्रकार अभिमन्यू फड यांच्या सह राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व आरोपीस कडक शासन व्हावे या मागणी साठी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी एकत्रित येऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातोय, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जातेय त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्र...

अंबाजोगाईत त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यान

Image
देविदास भाऊ सोनवणे लिखित प्रबोधनपर भीमगीतांचा कार्यक्रम ; बोधिघाट परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क ) येथील बोधिघाट परिवाराच्या वतीने अंबाजोगाईत त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व देविदास भाऊ सोनवणे लिखित प्रबोधनपर भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंबाजोगाई शहरातील बोधिघाट परिवाराच्या वतीने मंगळवार, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव समितीने "बुध्दभुमी", बोधिघाट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव ढगे हे होते. तर उदघाटक म्हणून अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे आणि प्रमुख व्याख्याता म्हणून प्रा.डॉ.शैलजाताई बरूरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनंतदादा लोमटे, सामाजिक कार्यकर्त्या सुलोचनाताई आडसुळे, सुचिताताई सोनवणे हे मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. प्रारंभी जयंतीनिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस...

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Image
- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले जाहीर ======================= मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केले.  महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सन्माननिय डॉ.आप्पासाहेबांची भेट ही घेतली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी हे मागील 30 वर्षांपासून निरूपण करीत असून अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासी पाडे, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्या शिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येत...

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ======================== मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले. अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर – गोवा, विरार-अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले. आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभ...

राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरूणांना संधी - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

Image
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावेत - राज्य सरकारचे आवाहन ======================== मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरूण व होतकरू मुला - मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना ही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्...

अंबाजोगाईतील पुलासाठी आ.नमिताताई मुंदडांनी आणला साडेपाच कोटींचा निधी

Image
अभियांत्रिकी महाविद्याजवळील जीर्ण दगडी पूल होणार जमीनदोस्त ; नवीन पुलाची होणार निर्मिती ====================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील जीर्ण झालेला जुना दगडी पूल पडून तिथे नवीन नवीन पूल उभारण्यासाठी आ.नमिताताई मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून साडेपाच कोटींचा निधी मंजूर करून घेता आहे.  अंबाजोगाई शहरातील माता रमाई आंबेडकर चौकापासून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर वन विभागाच्या कार्यालयासमोर असणारा जुना दगडी पूल जीर्ण झाला होता. तसेच, कालौघात रस्त्याच्या तुलनेत पूल अरूंद आणि कमी उंचीचा झाला होता. परिणामी अनेकदा लहानमोठे अपघात होऊन वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नवीन रूंद आणि उंच पुलाची मागणी होऊ लागली होती. याची दखल घेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी नवीन पुलाच्या निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर आ.मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने या पुलासाठी ५ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन...

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या सन्मान सोहळ्याचे शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत आयोजन

Image
शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी "नव्या युगाची शेती" या विषयावर होणार परिसंवाद ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने 'नव्या युगाची शेती' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.  मान्यवर वक्ते : या परिसंवादात कृषी ऊर्जेच्या संभावना या विषयावर डॉ.प्रशांत शिनगारे (पुणे) हे विचार मांडणार आहेत. तसेच "जनुकीय परावर्तित बियाणे (जीएम सीड्‌स)" या विषयावर डॉ.विलास पारखी (ग्रुप लीडर महिको,जालना) हे "नैसर्गिक शेतीचे बलस्थानं" या विषयावर डॉ.कल्याणराव आपेट (वनस्पती रोगशास्त्र, कृषी विद्यापीठ, परभणी) व "सेंद्रिय शेतीची मर्यादा" या विषयावर मा.दिलीप चव्हाण (जनरल मॅनेजर राजदीप फाॅस्पेट इंडिया लि.पुणे) आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होईल.   जाहीर आवाहन : नव्या युगाची शेती या जिव्हा...