अंबाजोगाईतील पुलासाठी आ.नमिताताई मुंदडांनी आणला साडेपाच कोटींचा निधी
अभियांत्रिकी महाविद्याजवळील जीर्ण दगडी पूल होणार जमीनदोस्त ; नवीन पुलाची होणार निर्मिती
======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील जीर्ण झालेला जुना दगडी पूल पडून तिथे नवीन नवीन पूल उभारण्यासाठी आ.नमिताताई मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून साडेपाच कोटींचा निधी मंजूर करून घेता आहे.
अंबाजोगाई शहरातील माता रमाई आंबेडकर चौकापासून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर वन विभागाच्या कार्यालयासमोर असणारा जुना दगडी पूल जीर्ण झाला होता. तसेच, कालौघात रस्त्याच्या तुलनेत पूल अरूंद आणि कमी उंचीचा झाला होता. परिणामी अनेकदा लहानमोठे अपघात होऊन वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नवीन रूंद आणि उंच पुलाची मागणी होऊ लागली होती. याची दखल घेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी नवीन पुलाच्या निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर आ.मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने या पुलासाठी ५ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिताताई मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
========================
Comments
Post a Comment