पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या, अभिमन्यू फड यांच्यावरील हल्ल्याचा अंबाजोगाईत निषेध


आरोपीस कडक शासन व्हावे मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पत्रकारांची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


गटतट विसरून अंबाजोगाईत पत्रकारांचा निदर्शनात उस्फुर्त सहभाग

=========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क)

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या, परळी येथील पत्रकार अभिमन्यू फड यांच्या सह राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व आरोपीस कडक शासन व्हावे या मागणी साठी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी एकत्रित येऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.



यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातोय, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जातेय त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे. महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून दुचाकीवर जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा कार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आसुन आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी या निवेदनाद्वारे आमची मागणी आसुन चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील केज बसस्थानकात परळी कडे जाणाऱ्या बस मध्ये परळी येथील सुदर्शन न्यूज चॅनलचे पत्रकार अभिमन्यू फड यांच्यावर काही समाज कंटकानी हल्ला करून त्यांच्या विरोधातच केज पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांच्यावरच दबाव तंत्राचा वापर करण्यात आला या घटनेचाही आम्ही तीव्र निषेध करत आसुन त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी या निवेदना द्वारे करत आहोत. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत. राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हल्लेखोरास कठोर शासन व्हावे व कुटुंबियांना न्याय मिळावा, राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची जबाबदारी सरकारची असून त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे पत्रकारांनी केली आहे. हे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार मा.विपीन पाटील यांनी स्वीकारले. तर निवेदनाच्या प्रति मा ना.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड यांना देण्यात आल्या असुन या वेळी करण्यात आलेल्या निदर्शनाच्या वेळी मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, मराठी पत्रकार परिषदचे तालुकाध्यक्ष गजानन मुडेगावकर, सचिव विरेंद्र गुप्ता, पत्रकार अ.र.पटेल, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप अडसूळ, अंबाजोगाई पत्रकार संघाचे सचिव तथा लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्कचे संपादक रणजित डांगे, प्रशांत लाटकर, हल्ला विरोधी कृती समिती सदस्य अशोक दळवे, गोविंद खरटमोल, पुनमचंद परदेशी, अशोक कचरे, संग्राम महाराष्ट्र न्यूजचे संपादक अभिजित लोमटे, मारुती जोगदंड, सुनील सिरसाट, शेख मुशीर बाबा, वसुदेव शिंदे, अंबाजोगाई लोकनामाचे संपादक बालाजी खैरमोडे, सय्यद नईम, संजय लोहिया, गजानन वांगीकर, जोगोजी साबणे, नागनाथ आप्पा वारद, बालाजी वैष्णव, दैनिक जय गणनायकचे संपादक स.का.पाटेकर आदी पत्रकारांनी गटतट विसरून निदर्शनात उस्फुर्त सहभाग घेतला.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड