शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या सन्मान सोहळ्याचे शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत आयोजन
शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी "नव्या युगाची शेती" या विषयावर होणार परिसंवाद
=======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने 'नव्या युगाची शेती' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवर वक्ते :
या परिसंवादात कृषी ऊर्जेच्या संभावना या विषयावर डॉ.प्रशांत शिनगारे (पुणे) हे विचार मांडणार आहेत. तसेच "जनुकीय परावर्तित बियाणे (जीएम सीड्स)" या विषयावर डॉ.विलास पारखी (ग्रुप लीडर महिको,जालना) हे "नैसर्गिक शेतीचे बलस्थानं" या विषयावर डॉ.कल्याणराव आपेट (वनस्पती रोगशास्त्र, कृषी विद्यापीठ, परभणी) व "सेंद्रिय शेतीची मर्यादा" या विषयावर मा.दिलीप चव्हाण (जनरल मॅनेजर राजदीप फाॅस्पेट इंडिया लि.पुणे) आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होईल.
जाहीर आवाहन :
नव्या युगाची शेती या जिव्हाळ्याच्या विषयावरील परिसंवाद आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या सन्मान सोहळ्याला विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट आणि अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष लखन होके यांनी केले आहे.
=======================
Comments
Post a Comment