सौ.भाग्यश्री देशपांडे - पाटील यांना वसंतराव देशपांडे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर




निवडीचे संगीत क्षेत्रातून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव

=======================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे 

(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

डॉ.वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशन, चिंचवड (पुणे.) या नामांकित संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ.वसंतराव देशपांडे पुरस्कार महाराष्ट्रातील शास्त्रीय गायनातील प्रथितयश व संगीत क्षेत्रात विशेष प्रगती करणाऱ्या कलावंताला दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी मुंबई येथील सौ.भाग्यश्री देशपांडे - पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या भुमीकन्या असलेल्या सौ.भाग्यश्री देशपांडे - पाटील यांच्या निवडीचे संगीत क्षेत्रातून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

6 मे ला होणार वितरण शास्त्रीय गायनातील अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे आहे. हा पुरस्कार दिनांक 6 मे 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रा.रामकृष्ण मोरे सांस्कृतिक सभागृह, चिंचवड, पुणे. येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते सौ.भाग्यश्री देशपांडे - पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर पुरस्कार प्राप्त कलावंताचे शास्त्रीय गायन पण, होणार आहे. त्यांना हार्मोनियम व तबला साथ अनुक्रमे उपेंद्र सहस्त्रबुद्धे आणि विघ्नहरी देव हे करणार आहेत असे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कार्यकारी विश्वस्त ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ, गायक तसेच नाट्य कलावंत रवींद्रजी व सौ.वंदनाजी घांगुर्डे यांनी प्रसिद्धीपत्राव्दारे कळवले आहे. रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

अंबाजोगाईतून विशेष कौतुक...!

संगीत क्षेत्रात अत्यंत कमी वयात अलौकिक यश संपादन केलेल्या अंबाजोगाईच्या भुमीकन्या सौ.भाग्यश्री देशपांडे - पाटील यांना पं.वसंतराव देशपांडे यांच्या नावाचा शास्त्रीय संगीत गायनाचा पुरस्कार मिळाल्याची वार्ता अंबानगरीत दाखल होताच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, आ.नमिताताई मुंदडा, पं.उध्दवबापू आपेगावकर, तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, युवा संगीतकार ओंकार रापतवार आदिंनी भाग्यश्री देशपांडे यांच्या यशाचे कौतुक केले आहे.

=======================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड