वडवणी शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव उजगरे यांचे आवाहन
=================================================
वडवणी / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने वडवणी शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या विविध कार्यक्रमांसाठी आवर्जून उपस्थित राहावे व आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव उजगरे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी शहरांमध्ये यावर्षी भव्य दिव्य अशा स्वरूपात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भूतपूर्व सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाची आयोजित करण्याचे समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले असून उद्याच्या 13 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजुन 35 मिनिटांनी खास मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या आगळ्या वेगळ्या इफ्तार पार्टी मध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. त्याच बरोबर गुरूवार, दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. आणि रॅली नंतर म्हणजेच सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम घेतला जाणार आहे. तसेच वडवणी शहर आणि तालुक्यातून कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या जनतेला स्नेहभोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. तरी या 13 व 14 एप्रिल रोजी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव उजगरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
================================================
Comments
Post a Comment