समाजाने महापुरूषांच्या जाती-धर्माचा नव्हे तर त्यांच्या विचारांचा वारसा जोपासावा - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले


================================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

महापुरूषांचे कार्य कोण्या एका जाती-धर्मासाठी नसते तर ते संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार मांडतात. त्यामुळे महापुरूषांच्या जाती-धर्माचा नव्हे तर त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समाजाने जोपासावा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक सचिव डॉ.राजेश इंगोले यांनी केले.

क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त व्यंकटेश स्कूल ऑफ नर्सिंग येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी पुढे बोलताना डॉ.इंगोले यांनी महात्मा फुले यांनी "विद्ये विना मती गेली" या संदेशाद्वारे समाजाच्या अधोगतीस अज्ञान व अंधश्रद्धा या गोष्टी कारणीभूत आहेत हे स्पष्ट करीत तत्कालीन विषमतावादी व्यवस्थेद्वारे होत असलेल्या अन्यायाविरूद्ध बंड पुकारले आणि सामाजिक क्रांती घडवून आणली. स्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, सामाजिक न्यायाचा प्रश्न असेल, स्रिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क असेल किंवा दलितांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न, बहुजनांचा शिक्षणाचा हक्क असेल, या हजारो वर्षांपासूनच्या गुलामगिरी विरूद्ध महात्मा फुले यांनी बंड पुकारत तत्कालीन भारतात सामाजिक क्रांतीच घडवून आणली. स्रियांना, बहुजनांना त्यांचे न्यायिक हक्क मिळवून दिले, त्यामुळेच पुढे राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महामानवांमुळे समाजात परिवर्तन घडून आले. त्यामुळे महापुरूषांचे विचार हे समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात, क्रांती घडवून आणतात, परिवर्तन घडवून आणतात हे दिसून येते, त्यामुळे महापुरूषांचे कार्य हे सकल समाजाच्या उद्धाराचेच कार्य असते., त्यामुळे महापुरूषांच्या जातीचा वारसा सांगण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श वारसा सामाजिक कार्य करणाऱ्यांनी सांगावा असे जाहीर आवाहन डॉ.इंगोले यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.काळे यांनी मानले.

================================================


Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड