गारपीठीचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी - काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांत दोनदा गारपीठ ; अवकाळीने जास्त नुकसान
=============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांत दोनदा गारपीठ झाली आहे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर मागील दोन दिवसांत वीज पडून सात लोकांचा मृत्यू झाला असून अनेक बैल, शेळ्यांसारखी उपयुक्त जनावरे ही दगावली आहेत. सोबतच अनेक घरांवरील पत्रे उडाले असून त्यात कित्येकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे गारपीठ व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरकारने शेतकरी, नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने योग्य ती मदत करावी अशी मागणी बीड जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बीड जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, यावर्षी मार्च महिन्यामध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीठीचा जबरदस्त तडाखा बसला होता. मागील याचे पंचनामे होत नाही, तोच पंधरा दिवसांत कालपासून तब्बल दोन वेळा पुन्हा अवकाळी पावसाने मराठवाड्यासह बीड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसासह वारा आणि गारपीठ झाली. यात आंबा, मोसंबी, द्राक्षे, टरबुज, मोसंबी, खरबूज ही फळ पिकांचे तसेच ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला यासह इतर शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पडून दोन दिवसांत सात नागरिकांचा व 17 हून अधिक शेती उपयुक्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने यात कित्येक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करून. या अवकाळीने शेती पिकांचे 40 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. मागील काही वर्षांपासून शेतकर्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटांशी सामना करून दोन हात करावे लागत आहेत. मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीठ झाली होती. यात मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील शेकडो हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले होते. याचे पंचनामे पुर्ण होत नाही तोच पंधरा दिवसांत पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडू लागला. काल सकाळी आणि सायंकाळी अनेक ठिकाणी मोठी गारपीठ झाली. या पावसाने आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, टरबुज, खरबुज, संत्रा, मोसंबी यासह फळबागा आदी विविध पिकांचे नुकसान झाले. वादळी वार्यात वीजा पडून 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लहान - मोठे 17 हून अधिक जनावरे दगावली आहेत. अनेक नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने यात कित्येकजण जखमी झाले. 40 टक्क्यांपेक्षा जास्त हेक्टर वरील पिकांचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे की काय, असेच आता वाटू लागले आहे. राज्यकर्ते सत्तेत मश्गूल झाल्याने शेतकरी व कष्टकरी यांना कुणी वाली राहिलेला नाही. 15 दिवसांत दोनदा गारपीठ होवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाचवा, त्यांना आधार व दिलासा देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, कारण कालपासून बीड जिल्ह्यात पुन्हा गारांसह वादळी पाऊस झाला आहे. आंबा, संत्रा, टरबुज, मोसंबी, द्राक्षे या फळ पिकांचे आणि फळबागा यांचे तसेच गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी झालेल्या गारपीठीचे महसूल विभागामार्फत तात्काळ पंचनामे करून तसा अहवाल तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात यावा. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहायक यांनी स्वतः शेतात जावूनच पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहायक यांना द्यावेत अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
==============================================
Comments
Post a Comment