ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या इफ्तार कार्यक्रमास मुस्लिम समाज बांधवांची मोठी उपस्थिती
अंबाजोगाईचा सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी मुंदडा परीवाराची बांधिलकी
=======================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या इफ्तहार कार्यक्रमास शहर व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमास आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत आ.नमिताताई मुंदडा, अक्षयभैय्या मुंदडा आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी स्वतः प्रत्येकाची वैयक्तिक भेट देवून केले. अंबाजोगाई शहर व परिसरातील हिंदु आणि मुस्लिम बांधवांमध्ये गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला जातीय सलोखा कायम रहावा व येणा-या नव्या पिढीमध्ये ही या जातीय सलोख्याची बीजे पेरली जावीत यासाठी मागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या वतीने शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा आणि परिवाराशी गेली अनेक वर्षे सातत्याने सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध असलेले मुंदडा परीवाराचे अनेक मित्र हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, त्यांचे पुत्र अक्षयभैय्या मुंदडा हे शहर आणि परिसरातील अधिकाधीक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. शहरातील प्रत्येक मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यासाठी येणा-या मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर या इफ्तार कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करतात, यामुळे मुंदडा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास हजारो मुस्लिम बांधव उपस्थिती लावतात. रविवार, दिनांक ९ एप्रिल रोजी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या या इफ्तार कार्यक्रमास शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, आ.नमिताताई मुंदडा, अक्षयभैय्या मुंदडा यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम शेख रज्जाक, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, माजी नगरसेवक ताहेर भाई, सुजात शेख, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, अनंत अरसुडे, वैजेनाथ देशमुख, ऍड.संतोष लोमटे, नुर पटेल, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्यासह शहरातील अनेक हिंदु बांधवांनी इफ्तार कार्यक्रमास आलेल्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसह उपविभागीय अधिकारी शरद झाडके, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, तहसीलदार बिपीन देशमुख, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घोळवे, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सिध्देश्वर बिराजदार, डॉ.प्रशांत देशपांडे, डॉ.अभिमन्यु तरकसे, डॉ.संदीप निळेकर, डॉ.संजय चव्हाण, लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व निवारण उपचार केंद्राचे डॉ.चव्हाण, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.बाहेती व इतर मान्यवर, वकील संघाचे सदस्य, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================================
Comments
Post a Comment