तहसीलदार, नायब तहसीलदार सोमवारपासून बेमुदत संपावर



- नायब तहसीलदार गणेश सरोदे यांची माहिती

==============================================

अंबाजोगाई / रणजित डांगे

(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) 

महसूल विभागातील नायब तहसीलदार हे महत्त्वाचे कार्यकारी पद असून नायब तहसीलदार हे पद राजपत्रित वर्ग दोनचे पद आहे. परंतु, त्या पदाला राजपत्रित वर्ग २ च्या पदा इतके वेतन नसल्याने सोमवार, दि.३ एप्रिल पासून संपूर्ण राज्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार हे बेमुदत संपावर जाणार आहेत.



या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी स्विकारले  यावेळी सुरेन्द्र डोके, गणेश सरोदे, बनकर,  धावणे, मंदे संभाजी श्रीमती लिगदे, अभय जोशी, तहसीलदार व नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. वारंवार शासनाकडे ग्रेड पे वाढी संबंधात पाठपुरावा करण्यात आला. परंतु, त्याला यश आले नाही. तसेच बक्षी समितीने दिलेल्या अहवालात सुद्धा नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे वाढवून देण्यात आलेला नाही. नायब तहसीलदार हे पद लोकसेवा आयोगा मार्फत सरळसेवेने व पदोन्नतीने भरले जाते. परंतू इतर राजपत्रित गट- ब संवर्गाचा ग्रेड पे मात्र नायब तहसीलदार या पदापेक्षा जास्त आहे. नायब तहसीलदार हे महसूल खात्यातील महत्त्वाचे पद असून त्यांच्याकडे अर्धन्यायीक कामकाज, दंडाधिकारी, खनिकर्म, नैसर्गिक आपत्ती मदत व पुनर्वसन, निवडणूक, पर्यवेक्षकीय कामे इत्यादी महत्त्वाचे कामे असतात. तरी देखील या पदाच्या ग्रेड पे मध्ये वाढी संदर्भात दुर्लक्ष केल्यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सोमवार, दि.३ एप्रिल २०२३ पासून सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार संपावर जात असल्याने महसूल विभागाचे काम ठप्प पडणार आहे.


==========================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड