रूग्ण हक्क संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.निशिगंधा परळकर यांची निवड
डॉ.निशिगंधा परळकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
=============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
रुग्णांच्या न्याय व हक्काच्या संरक्षणार्थ महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात रूग्णसेवार्थ कार्य करणारी एकमेव समिती म्हणून सदैव कार्यरत असणाऱ्या रूग्ण हक्क संरक्षण समिती, महाराष्ट्र या समितीच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई येथील वैद्यकीय व्यवसाईक डॉ.सौ.निशिगंधा परळकर (काळेगावकर) यांची नियुक्ती लातुर येथे झालेल्या समितीच्या महत्वपुर्ण बैठकीत समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.निलेश करमुडी आणि प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ यांच्या सुचनेने महिला प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा यांनी जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र देऊन कार्यरत करण्यात आले. सदर नियुक्तीचे स्वागत समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, प्रदेश संघाटक नरेंद्र बोरा, प्रदेश संपर्कप्रमुख डॉ.विनोद इघवे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीरव नवरखेले, मराठवाडा महिला अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा महिला कार्याध्यक्षा कावेरी विभुते, मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकर सोनावणे, मराठवाडा संघटक रवी बिजलवड, नांदेड महिला जिल्हाध्यक्ष डॉ.मनिषाताई तिवारी, परभणी महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई सारोदे, लातूर महिला जिल्हाध्यक्ष पद्मवती टेकाळे, परभणी कार्याध्यक्षा सुरेखाताई खिल्लारे, अकोला महिला जिल्हाध्यक्ष संगिता भंडारे, पुणे महिला कार्याध्यक्षा वैशाली वाकळे, जिंतुर महिला तालुकाध्यक्षा कविता घनसावंत, धाराशिव जिल्हाध्यक्षा कार्तिका घाडगे, नांदेड उत्तर महिला जिल्हाध्यक्षा बनसोडे, हिंगोली जिल्हाध्यक्ष संतोष हादवे, नांदेड जिल्हाध्यक्ष सुनिल डोईजड लातूर जिल्हाध्यक्ष दीपक गंगणे, लातूर शहर संपर्कप्रमुख कृष्ण राठोडकर ,आदीसह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
==============================================
Comments
Post a Comment