आमदार नमिताताई मुंदडा यांचे भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अहमद पप्पूवाले यांनी मानले आभार


 अंबाजोगाई तालुक्यातील निराधारांचे थकीत अनुदान बँक खात्यावर जमा

============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर गेल्या काही महिन्यांपासूनचे थकीत असलेले अनुदान मागील दोन दिवसांत टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आल्याने अंबाजोगाई तालुक्यातील गरजू, गोरगरिब, वृध्द निराधारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात ईद सणाच्या आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर थकीत अनुदान बँक खात्यात जमा झाल्यामुळे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांचे भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अहमद करीम पप्पूवाले यांनी धन्यवाद देत आभार मानले आहेत.

याबाबत भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अहमद करीम पप्पूवाले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, शासनाचा आर्थिक मदतीचा लाभ देणार्‍या योजनांचा निधी मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागतात. परंतु, अंबाजोगाई तहसील कार्यालयाने त्यांना नेहमीच सुखद असा अनुभव दिला आहे. दरम्यान, कोरोनाच्या कठीण काळात आमदार सौ.नमिताताई मुंदडा व ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी गोरगरीब, वृद्ध, विधवा या लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे काम केले, सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अनुदान मिळवून दिले, गेल्या दिवाळी पासूनचे थकीत अनुदान मागील दोन दिवसांत मिळाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील वृध्द आणि निराधारांनी सौ.नमिताताई तसेच अंबाजोगाई येथील तहसीलदारांना धन्यवाद दिले आहेत. निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आदींचा समावेश आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणार्‍या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. ६५ वर्षांहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरूष, दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असणार्‍या निराधार व आर्थिकदृष्टया असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या योजनेचा लाभ मिळतो. अंबाजोगाई तालुक्यात संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना अशा योजनेतील जे लाभार्थी आहेत. मानधनाची रक्कम मागील दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.

आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांचे आभार :

विविध अर्थसहाय्य योजनेतून देण्यात येणारे अनुदान मागील काही महिन्यांपासून येणे बाकी होते, त्यामुळे या संदर्भात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे भाजपा राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे, खासदार मा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यामुळे यावेळी आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना थकीत महिन्याचे अर्थसाहाय्य देण्याबाबत जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश प्राप्त झाले. त्या आदेशानुसार पुढची कार्यवाही अंबाजोगाई तहसीलदार व तहसील कार्यालयाकडून होत आहे. आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याकरिता अंबाजोगाई तालुक्यातील या योजनेतील लाभार्थ्यांना चालू एप्रिल महिन्यात मागील दोन दिवसांत त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, आमदार सौ.नमिताताई मुंदडा, जिल्हाधिकारी, बीड व तहसील कार्यालय अंबाजोगाई यांच्याकडून दुर्बल घटकांना तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात ईद सणाच्या आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांचे जाहीर आभार.

- अहमद करीम पप्पूवाले (शहराध्यक्ष, भाजपा अल्पसंख्याक आघाडी, अंबाजोगाई)

============================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड