केज तालुक्यातील वडमाऊली देवस्थानासाठी आ.नमिताताई मुंदडा यांनी आणला दोन कोटींचा निधी
अनेक वर्षांची मागणी पूर्ण ; भाविक भक्तांनी व्यक्त केले समाधान
==============================================
केज (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
तालुक्यातील प्रसिध्द आलेल्या वडमाऊली देवस्थानाच्या विकासासाठी आ.नमिताताई मुंदडा यांनी पाठपुरावा करून १ कोटी ९७ लाखांचा निधी उपलब्ध करून घेण्यात यश मिळविले आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने वडमाऊली देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सतत वर्दळ असते. मात्र, भाविकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुऱ्या होत्या. त्यामुळे या देवस्थानाचा विकास करावा अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांमधून सातत्याने केली जात होती.
केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी या मागणीची दखल घेत शासनाकडे देवस्थानच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर आ.मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने वडमाऊली देवस्थानाच्या विकासासाठी तब्बल १ कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून सभा मंडप, पेव्हर ब्लॉक, पिण्याच्या पाण्याची सोय, भक्त निवास आदी कामे केली जाणार आहेत. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पुर्ण होत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निमित्ताने देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना.गिरीशजी महाजन, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिताताई मुंदडा यांनी आभार मानले आहेत. तर भाविक भक्तांकडून आ.नमिताताई मुंदडा यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे.
================================================
Comments
Post a Comment