धनराज गौतमचंद सोळंकी यांची "बीजेएस"च्या राज्य कार्यकारिणीवर निवड
सामाजिक कार्यकर्ते धनराज सोळंकी यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन
=============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
शेती व्यवसायाशी निगडीत असलेले पारंपरिक व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते धनराज गौतमचंद सोळंकी यांची भारतीय जैन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते धनराज सोळंकी यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.
धनराज सोळंकी हे गेली अनेक वर्षे भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी आहेत. व्यापार, सामाजिक कार्यासोबतच ते भारतीय जैन संघटनेशी गेली अनेक वर्षांपासून निगडित आहेत. अंबाजोगाई तालुका अध्यक्ष पदापासून त्यांनी आपल्या सामाजिक कामाला सुरूवात केली. बीड जिल्हा अध्यक्ष, मराठवाडा विभाग अध्यक्ष अशी प्रमुख जबाबदारी स्विकारत त्यांनी राज्य कार्यकारीणीत प्रवेश मिळवला. व्यवसाय, सामाजिक कार्य करीत असताना त्यांनी मोठा मित्र परीवार आपल्या सोबत जोडला आहे. स्वच्छ प्रतिमेचे व्यावसायिक, समर्पित कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात धनराज सोळंकी हे यशस्वी झाले आहेत. भारतीय जैन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेकांसह रणजित डांगे (संपादक लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
=================================================
Comments
Post a Comment