बार्टी तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ; सामाजिक समता पर्वाची सुरूवात
समतादूत व्यंकटेश जोशी यांचेकडून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन
================================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
साक्षरतेचा मूलमंत्र देणारे, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, सामाजिक न्याय विभाग व महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या मार्गदर्शनानूसार अंबाजोगाई तालुक्यातील समतादूत व्यंकटेश जोशी यांनी मंगळवार, दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले होते. जिल्हा परिषद शाळा चनई, महात्मा ज्योतिबा फुले वसतीगृह अंबाजोगाई, आदी ठिकाणी अभिवादन करून सामाजिक न्याय विभागाच्या व बार्टीच्या विविध योजनांची माहिती सांगण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर सर्व शिक्षक वृंद, वसतीगृहातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे व बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी समतादूत प्रकल्प यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.
बार्टी व सामाजिक न्याय विभागातर्फे 14 एप्रिल ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची तारीख केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण एप्रिल महिनाभर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे व त्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे.
===============================================
Comments
Post a Comment