अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी - संभाजी ब्रिगेड आक्रमक
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई प्रश्नावर संभाजी ब्रिगेडचा सरकारला आंदोलनाचा इशारा
==============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
जुलै ते ऑक्टोबर 2022 या महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका या पिकासह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी एक लाख रूपये अनुदान द्यावे. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या मागणीसाठी 22 ऑक्टोबर 2022 रोजी पाटोदा (म) तालुका अंबाजोगाई, (जि.बीड) येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले होते. दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथेही लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी प्रशासनाकडून अनुदान देण्याचा शब्दही दिला गेला. परंतु, अद्याप ही शासनाने शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचितच ठेवले आहे. ही बाब खूप गंभीर असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना अनुदान नाही दिल्यास समस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उत्तमराव ठोंबरे, तालुकाध्यक्ष संभाजीराव घोरपडे, जिल्हा सचिव नारायणराव मुळे, "माणूस वाचवा अभियान"चे धीमंत राष्ट्रपाल, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनीताई लोमटे, तालुकाध्यक्ष सुनंदाताई लोखंडे, उपाध्यक्ष जमुनाताई सुरवसे, हेमराज देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
============================================
Comments
Post a Comment