कोरोनाबाबत देशाने घाबरू नये, तर सतर्क राहावे - केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय
कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व रूग्णालयांचा दौरा करून मॉक ड्रिल आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार
==============================================
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण संख्येचा आलेख वाढत चालला आहे. मागील 24 तासांत देशात 6,050 नवीन केसेस समोर आल्या आहेत. आतापर्यंत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह केसेसचा आकडा 28,303 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविय यांनी, आरोग्यमंत्र्यांना संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व रूग्णालयांचा दौरा करून मॉक ड्रिल आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगितले आहे. मांडविय म्हणाले, देशातील सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील आपातकालिन स्थिती आणि कोरोना हॉटस्पॉटची माहिती घेण्यास सांगितली आहे. त्यासोबतच टेस्टिंग, जिनोम सिक्वेंन्सिग वाढविण्याचे आदेश दिले आहेत. हॉस्पिटल्स मध्ये मुलभूत सुविधा आहेत की नाही, याची माहिती घेऊन त्या अधिक सक्षम करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, आम्हाला घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, देशात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय ही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. (Covid 19) या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत करोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नियमावली जाहीर करत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला आहे. (Covid 19) आज केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली,” अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी दिली होती. 10 आणि 11 एप्रिलला संपूर्ण देशात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय रूग्ण सज्ज आहे ते समजेल. त्यानुसार आरोग्य यंत्रणा संख्येनुसार आरोग्य यंत्रणा किती प्रमाणात वाढवण्यात येईल. एमर्जन्सी कोवीड प्रिपेडनेस पॅकेजचा निधी अद्याप संपूर्ण संपलेला नाही. (Covid 19) त्यामुळे हा निधी त्या त्या ठिकाणी वापरून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार म्हणाल्या.
▫️▫️▫️
============================================
Comments
Post a Comment