राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी भगवानराव ढगे यांची निवड
भगवानराव ढगे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन
==============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन तसेच जिल्हाध्यक्ष एॅड.राजेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अंबाजोगाई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत भगवानराव ढगे यांची बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
या आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एॅड.राजेश्वर चव्हाण, केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.पृथ्विराज साठे, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष बालाजी शेरेकर, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुलोचना आरसुडे यांच्यासह केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवानराव ढगे यांनी त्यांच्या राजकीय कार्याची सुरूवात 1979 साली विद्यार्थी दशेपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केली. शहर, तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध पदावर पक्ष निष्ठा जोपासत इमाने - इतबारे काँग्रेस पक्षाचे कार्य केले. अखिल भारतीय काँग्रेस बीड जिल्हा कमिटीचे ढगे हे अनेक वर्षे जिल्हा सरचिटणीस ही होते. दीड वर्षांपूर्वी ढगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार, विरोधी पक्षनेते आ.अजितदादा पवार, माजी मंत्री आ.धनंजयजी मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. विविध सामाजिक, विधायक उपक्रम राबविण्यात ढगे यांचा नेहमीच पुढाकार व सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आल्याबद्दल भगवानराव ढगे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. आपल्या निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस भगवानराव ढगे यांनी सांगितले की, माजी मंत्री आ.धनंजय भाऊ मुंडे, जिल्हाध्यक्ष एॅड.राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजयभाऊ दौंड, माजी आमदार पृथ्विराज साठे या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत पक्ष संघटनेची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल मी या वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना अभिप्रेत असलेले पक्ष संघटना बळकट व मजबूत करणे, तसेच पक्षाची ध्येय - धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, पक्ष वाढीसाठीचे काम सर्वांना सोबत घेऊन करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस ढगे यांनी यावेळेस सांगितले. ढगे यांच्या निवडीचे माजी आमदार संजयभाऊ दौंड, माजी आमदार पृथ्विराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, बाळासाहेब सोनवणे, व्यंकटराव मुंडे, सुधाकर जोगदंड, लक्ष्मण कर्नर, दत्ताभाऊ सरवदे, तानबा लांडगे, भीमसेन लोमटे, हमीद चौधरी, उज्जैन बनसोडे आदींसह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.
============================================
Comments
Post a Comment