राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांचे नेतृत्व बळकट करणार - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) चे मराठवाडा संघटक संजयभाऊ तेलंग
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) च्या वतीने राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन ; पदाधिकाऱ्यांच्या निवडी
===============================================
मुंबई / विशेष प्रतिनिधी (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात मराठवाडा कार्याध्यक्ष बबनभाऊ जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) ला संघटनात्मक पातळीवर बळकट करणार असे प्रतिपादन मराठवाडा संघटकपदी संजय भाऊ तेलंग यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) च्या वतीने राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच पार्टी कार्यालय, चेंबुर (मुंबई) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात झाली. या बैठकीस बाळासाहेब पवार (महाराष्ट्र कार्याध्यक्ष), डॉ.मोहनलाल पाटील (राष्ट्रीय महासचिव), तसेच सन्माननिय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक चळवळीचे सक्रीय नेतृत्व करणारे बबनभाऊ जंगले यांची रिपाइं (ए) च्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी, तर ओबीसीचे कणखर नेतृत्व करणारे संजय भाऊ तेलंग यांची निवड रिपाइं (ए) मराठवाडा संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते बबनभाऊ जंगले आणि संजय भाऊ तेलंग यांना नियुक्तीपत्र देऊन मराठवाडा संघटनात्मक बांधणी, पार्टीची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जवाबदारी देण्यात आली. या प्रसंगी रिपाइं (ए) चे पदाधिकारी शुभम् इंगळे, अमोल पौळ, अमर वाघमारे, संतोष ताटे, सुंदर काळे, सुधीर गपाट, विक्रम शिनगारे, अमित ठोके, आम्रपाली गजाशिव, पुष्पा साखरे, सुवर्णा गोरे, उमा गायकवाड, आम्रपाली अल्टे, गंगासागर गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी निवड करण्यात आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत व अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
=================================================
Comments
Post a Comment