विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंच्या विचारांचे आचरण करावे - मुख्याध्यापक बाबुराव आडे
श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी
============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
'थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य हे समाजामध्ये अमूलाग्र बदल घडविणारे कार्य आहे, विद्येशिवाय गत्यंतर नाही, या विचाराने त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत शैक्षणिक कार्य हाती घेऊन समाजोद्धाराचे व्रत घेतले. विद्यार्थ्यांनी सुद्धा महात्मा फुलेंच्या या शैक्षणिक विचारांचे आचरण करावे' असे प्रतिपादन भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव आडे यांनी केले.
येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग हा स्वतःला शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका सौ.सपना डुकरे यांनी विद्यार्थांना महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवन परिचय अत्यंत अभ्यासपूर्ण व समर्पक शब्दांत करून दिला. ज्येष्ठ शिक्षिका सौ.जयश्री इटकुरकर यांनी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात करण्याजोगे अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम सांगतांना स्वतःला घडविण्यासाठी अवांतर वाचन व हे उपक्रम यांचे महत्व विशद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे हे होते. यावेळी उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभागप्रमुख प्रशांत पिंपळे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सौ.सुरेखा काळे, विश्वास पत्की तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू - भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार ज्ञानेश मातेकर यांनी मानले.
================================================
Comments
Post a Comment