अंबाजोगाईत परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा, तर स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जयंती निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
पेशवा युवा, महिला व युवती संघटन यांचा पुढाकार
===============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
शहरातील पेशवा युवा, महिला व युवती संघटन यांच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा व स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
22 एप्रिल 2023 शनिवार रोजी भगवान परशुराम जयंती निमित्ताने दुपारी पाच वाजता देशपांडे गल्लीतील रणझुंजार बाजीप्रभु देशपांडे चौक येथुन शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा निघणार आहे तर 30 एप्रिल रोजी शहरातील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात दुपारी पाच वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा.वि.दा.सावरकर चरित्राचे गाढे अभ्यासक तथा जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे विचार दर्शन व सावरकरांचे हिंदुत्व या विषयावर व्याख्यान होणार असून अगोदरच आपले आसन विनामूल्य आरक्षित करावे या सर्व कार्यक्रमासाठी शहरातील महिला नागरिक युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी सचिव शैलेष कुलकर्णी, जेष्ठ मार्गदर्शक तथा अंबाजोगाई तालुका अध्यक्ष रंगनाथ वैद्य, ब्राम्हण सभेचे अध्यक्ष अनिरूद्ध चौसाळकर, डॉ.अतुल देशपांडे, प्रदीप कुलकर्णी, पत्रकार सर्वश्री रामभाऊ कुलकर्णी, राहुल देशपांडे, अविनाश मुडेगावकर प्रशांत बर्दापूरकर, ज्ञानेश मातेकर, अमित देशपांडे, एॅड.कल्याणी विधें, करूणा अघोर, प्रसाद पाठक, शैलेश गोस्वामी, पद्मनाथ देशपांडे, सुमीत केजकर, अजय पांडे, अक्षय देशपांडे, सागर दिक्षित, विशाल देशपांडे, सुशेन देशपांडे, मंदार देशपांडे, अमोल कुलकर्णी, ओंकार पांडे यांच्यासह इतरांनी केले आहे.
=================================================
Comments
Post a Comment