भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त न्यू सिद्धार्थ ग्रुप नवा मोंढा यांची बांधिलकी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान ; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
==============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
शहरातील न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा यांच्या वतीने यावर्षी ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविण्यात आले. अन्नदान करून तसेच विविध उपक्रम राबवून महामानवांना मानवंदना देण्यात आली.
याबाबत न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बालासाहेब आदमाने यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहरात 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा यांच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यातील अन्नदान 5 क्विंटल खिचडीचे वाटप हा उपक्रम संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. अल्पोपहार म्हणून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खिचडी वाटप करण्यात आली. तसेच जयंतीनिमित्त यावेळी सर्व महामानवांचे विचार समाजासमोर घेऊन जाण्यारे आकर्षक देखावे सादर करण्यात आले, विशेष म्हणजे शहरात येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायी यांचेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर्षी ही करण्यात आली होती. "सोनबा येवले पानपोई"चे हे 10 वे वर्ष आहे. तसेच जयंती उत्सवाचे सोशल मीडियावरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आकांक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभैय्या देशमुख हे लाभले होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर नवा मोंढा येथील भव्य मिरवणुकीचे मोठ्या थाटामाटात आणि आतिषबाजीच्या गजरात आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीतील देखाव्यांनी लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर या सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे सर्व जाती - धर्माच्या लोकभावनांचा आदर करीत सदर मिरवणूक शांततामय वातावरणात काढण्यात आली. यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बालासाहेब आदमाने यांनी विशेष प्रयत्न केले. तर या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव समितीचे सदस्य मिलिंद आदमाने, आकाश साळवे, अक्षय आदमाने, संकेत मस्के, विजय आदमाने, राजेभाऊ साळवे, बाबासाहेब आदमाने, अशोक गडसिंग, अशोक सहजराव, अक्षय मस्के, अजय आदमाने, अविनाश साळवे, बाळू गडसिंग, संजय (भिमा) आदमाने, दादासाहेब जोगदंड, अशोक, अनिल सहजराव, उमेश सहजराव, नितीन शेळके, अतुल शेळके, लखन आदमाने, करण जोगदंड, राहुल जोगदंड, रूपेश मस्के, गौतम आदमाने, शेख सलमान, प्रशिक गडसिंग, संदेश पवार, दीपक मस्के, बाळु गडसिंग, प्रतीक बनसोडे आदींसह न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि युवकवर्ग यांनी पुढाकार घेतला.
==============================================
Comments
Post a Comment