"स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा" : अंबाजोगाईत आ. नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली निघाली बाईक रॅली
आमदार नमिताताई मुंदडा, अक्षयभैय्या मुंदडा यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी
================================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ अंबाजोगाई शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आ.नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोठी बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष केला. अंबाजोगाई शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली संपूर्ण अंबाजोगाई शहरातून निघाली. या बाईक रॅलीत केज मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा, अक्षयभैय्या मुंदडा यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आ.नमिताताई मुंदडा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा या सर्व बाबी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ केज विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे आ.नमिताताई मुंदडा यांनी सांगितले.
================================================
Comments
Post a Comment