नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी - आ.नमिताताई मुंदडा
बीड जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाने झाले मोठे नुकसान
======================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केज मतदारसंघाच्या आ.नमिताताई मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यात केज मतदारसंघासह शनिवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांचा गहु, टरबूज, खरबूज, अंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सदर फळबाग पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केज मतदारसंघाच्या आ.नमिताताई मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे.
======================================
Comments
Post a Comment