जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय आणि क्रेडाई अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय भूमापन दिन" साजरा



अविरत आणि तत्पर सेवेचा सन्मान ; अंबाजोगाईतील 4 जणांचा गौरव

================================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

भूमि अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी कौशल्यपूर्ण व सातत्यपूर्ण कर्तव्य बजवावे असे आवाहन बीडचे अप्पर जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी केले आहे. ते बीड जिल्हा भूमि अभिलेख विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या "राष्ट्रीय भूमापन दिन" कार्यक्रमात बोलत होते. "राष्ट्रीय भूमापन दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रा मध्ये दरवर्षी 10 एप्रिल हा दिवस भूमी अभिलेख विभागाकडून "राष्ट्रीय भूमापन दिन" म्हणून साजरा करण्यात येतो त्यानुसार जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख बीड व अधिनस्त उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडून सोमवार, दिनांक 10 एप्रिल रोजी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, बीड येथे "राष्ट्रीय भूमापन दिन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "राष्ट्रीय भूमापन दिन" हा बीड जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीड येथील अप्पर जिल्हाधिकारी श्री.पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप व जिल्ह्यातील सर्व उपअधिक्षक भूमि अभिलेख तसेच कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होता. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी श्री.पाटील तसेच प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी जगताप यांच्या हस्ते मागील वर्षभरात बीड जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यानंतर सर्व कर्मचारी व अधिकारी यांना उपजिल्हाधिकारी जगताप तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी श्री.पाटील, उपजिल्हाधिकारी, दयानंद जगताप यांचे हस्ते उपअधिक्षक भूमिअभिलेख अंबाजोगाई या कार्यालयाने महसुली वसुली, मोजणी प्रकरणांचा निपटारा तसेच ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हेचे काम तत्पर व जलद गतीने 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल आणि अविरत सेवेचे व्रत अंगीकारून शासकीय सेवेत आपण केलेल्या निःस्पृह कार्याच्या सन्मानार्थ अंबाजोगाई उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय प्रमुख मनोज संधान, शिरस्तेदार संतोष क्षिरसागर, आवक जावक लिपिक श्रीमती अश्विनी टाक तसेच भूमापक राजू लखेरा यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या सोबतच बीड जिल्ह्यातील बीड उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल वर्षा सोनवणे, निमतानदार क्र.- 2 चंद्रकांत बोरसे, गेवराई उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार रमण गवळी, आवक जावक लिपिक सुवर्णा कांगरे, परिरक्षण भूमापक महेश कुलकर्णी, आष्टी उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापक शितल झापुगडे, वडवणी उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापक राहुल ढोके, परळी वैजेनाथ उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापक भास्कर वैद्य, शिरस्तेदार अविनाश गायकवाड, शिरूर कासार उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक उध्दव सानप, केज उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक भार्गव मस्के आणि पाटोदा उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील दुर्बिण भूमापक योगिता बहाळसकर या सर्वांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रायोजक - क्रेडाई अंबाजोगाई, संजय सुराणा, अनिताताई सुराणा आणि सुराणा परिवार, सुराणा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स, अंबाजोगाई हे होते. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दादासाहेब घोडके जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख (बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वृंद, संजय सुराणा (अध्यक्ष : क्रेडाई, अंबाजोगाई.) आणि क्रेडाई, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार घेण्यात आला.



==============================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड