डीवायएफआय (DYFI) चा गुरूवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
आक्रोश मोर्चात बेरोजगार तरूणांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हावे डीवायएफआयचे आवाहन
=============================================
अंबाजोगाई /संपादक रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने गुरूवार, दि. 13 एप्रिल रोजी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नौकरभरती करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली आहेत. मोर्चे काढले आहेत.यासंदर्भात पुन्हा उद्या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता धडकणार आहे. तरी या मोर्चात तालुक्यातील विद्यार्थी, बेरोजगार युवकांनी, जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन डी.वाय.एफ.आयचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव, तालुका अध्यक्ष देविदास जाधव, तालुका सचिव प्रशांत मस्के, रोहित देशमुख, सचिन टिळक, जगन्नाथ पाटोळे, अतुल सोमवंशी, राहुल भावठाणकर, विक्रम आगळे, पठाण साबेर, प्रदीप कोरडे, राम गडदे, बबलू सरवदे, नितीन मोरे, तुकाराम इंगळे, विजय पौळ, श्रीनिवास घनघाव, आदींनी केले आहे.
================
Comments
Post a Comment