बीड जिल्ह्यातून हजारो काॅंग्रेस कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर येथील "वज्रमूठ महाआघाडीची" या विराट सभेला उपस्थित राहणार





काँग्रेस प्रेमी जनता, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे आवाहन

=============================================

अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

रविवार, दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या भव्य मैदान या ठिकाणी "महाविकास आघाडीची वज्रमूठ विराट सभा" आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत करण्यात आली आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री आ.उद्धव बाळासाहेब ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते आ.अजितदादा पवार हे मान्यवर नेते संबोधित करणार आहेत. आगामी 10 जून 2023 पर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रेमी जनता, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे. 



याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, उद्या रविवार, दिनांक 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या "वज्रमूठ" सभेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आणि आदरणीय खासदार सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातून हजारो काॅंग्रेस कार्यकर्ते, काॅंग्रेस प्रेमी जनता, समविचारी पक्ष, संघटना तसेच बीड जिल्ह्यातील काॅंग्रेसचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहर पदाधिकारी, सर्व सेल, विभाग जिल्हा पदाधिकारी, तालुका, शहर पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर येथील "वज्रमूठ महाआघाडीची" या विराट सभेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. 


▫️▫️▫️

=============================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड